लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना व सबरी घरकूल योजना राबविली जाते. ग्रामीण भागातील प्रलंबीत घरकुलाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी बल्लारपूर तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांनी येथील संवर्ग विकास अधिकारी संध्या दिकोंडावार यांच्याशी घेतलेल्या बैठकीत केली.पंतप्रधान घरकूल योजनेत शासनाकडून शहर व ग्रामीण भागात भेदभाव केला जात आहे. शहरातील लाभार्थ्याला दोन लाख ५० हजार रुपये तर ग्रामीण भागातील लाभार्थ्याला दीड लाख रुपये अनुदान घरकूल बांधकामासाठी दिले जाते. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. घरकूल योजनेत भेदाभेद न करता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी केली.तत्पूर्वी येथील पं. स. सभागृहात ग्रामंपंचायत स्तरावरील विविध समस्या शासन स्तरावर सोडविण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर तालका सरपंच संघटनेची कार्यकारीणी गठित करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी कोठारी येथील सरपंच मोरेश्वर लोहे, सचिव बामणी (दुधोली) येथील सरपंच सुभाष ताजने, उपाध्यक्ष सरपंच रिता जिलटे, सहसचिव प्रमोद देठे नांदगाव (पोडे), कोषाध्यक्ष शालिकराव पेंदाम (कवडजई), सहकोषाध्यक्ष बंडू पारखी, सदस्य म्हणून ज्ञानेश्वर टेकाम दहेली, अर्चना वासाडे आमडी, जीवनकला आलाम किन्ही, गिरीधर आत्राम काटवली, शंकर खोब्रागडे पळसगाव, सुशिला मडावी कळमना, वैशाली पोतराजे लावारी, जितेंद्र कुळमेथे यांची निवड केली.
ग्रामीण भागातील घरकूलाचा प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:36 AM
तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना व सबरी घरकूल योजना राबविली जाते.
ठळक मुद्देसरपंच संघटनेची मागणी: संवर्ग विकास अधिकाऱ्यांसोबत बैठक