आदिवासबहुल, दुर्गम, अविकसित, मागास, नक्षलग्रस्त, अशी गोंडपिपरी तालुक्याची ओळख आहे. अशाही स्थितीत अगदी सीमेवर वसलेल्या सोनापूर देशपांडे गावातली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावं विकासासाठी ग्रामविकास विभागाच्या पेपरलेस ग्रामपंचायत उपक्रमात ही ग्रामपंचायत सरस कामगिरी बजावत जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून नावरुपाला आली.
गाव विकासाच्या दृष्टीने या ग्रामपंचायतिच्या माध्यमातून नागरिकांना सर्व प्रकारच्या सोई ऑनलाईन पद्धतीने मिळत आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता या ग्रामपंचायतिने ई ग्राम प्रणालीचा वापर करून संपुर्ण कामकाज करीत असल्याने येथील नागरिकांना सर्व कामे सोईचे झाले आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करीत सुंदर गाव अभियानात आपलं गाव सर्वांगीण सुंदर होण्यासाठी या दृष्टीने येथील ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू आहे.
कोट
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत ' संकल्पना राबवली आहे. शासनाच्या माहिती व सेवा गावकऱ्यांच्या सोयीसाठी आणि पारदर्शक सेवेसाठी ही संकल्पना संपूर्ण ग्राम पंचायतीने राबवावी.
- खुशाल हरडे,
प्रकल्प व्यवस्थापक, आपले सरकार सेवा केंद्र
कोट
राज्य शासनाच्या वतीने आदर्श गांव संकल्प व प्रकल्प समितीच्यावतीने गावाच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजना गावांत राबविण्यात येत आहेत. सुंदर गाव अभियान ही संकल्पना राबविणे सुरु आहे.-
-जया सातपुते, सरपंच सोनापूर देशपांडे