बॉक्स
भाकरीच परवडायची म्हणून खायचो
आमच्या बालपणात गहू कमी प्रमाणात मिळत होते. त्याउलट ज्वारी मुबलक मिळायची. त्यामुळे जेवणात भाकरीचा समावेश असायचा.
-पांडुरंग गेडाम
----
पूर्वीच्या काळात ज्वारीला प्रमुख पीक म्हणून ओळखले जायचे. जेवणात ज्वारीच्या भाकरी खाल्ल्या जात होत्या. त्या आर्थिकदृष्ट्या परवडत होत्या.
तुकाराम रायपुरे
बॉक्स
आता चपातीच परवडते
ज्वारीचे सेवन आरोग्यासाठी हितकारक असले तरी गव्हापेक्षा ज्वारीचे दर अधिक आहेत. एखाद्या वेळेस भाकरी खाणे चांगले वाटते. परंतु, दररोज खाणे शक्य नाही. मला पोळीच आवडते.
-ऋषी कोडापे
----
मागील काही वर्षांपासून ज्वारीच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षी ज्वारी ३० रुपये किलो तर गहू २५ रुपये किलो होते. परंतु, आता ज्वारीचे दर ३५ रुपये किलो तर गहू २८ रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
-मोंटू मानकर, व्यापारी गोलबाजार
बॉक्स
आपल्या आरोग्याची श्रीमंती ज्वारीतच...
ज्वारीची भाकरी पचायला हलकी असते. यामुळे नागरिक सध्या ज्वारीच्या खाद्यपदार्थाला पसंती देत आहेत.
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते.
ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी चपातीऐवजी आहारात ज्वारीचा समावेश करावा, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांची प्रकृती चांगली राहावी, यासाठी भाताऐवजी ज्वारीच्या कण्या किंवा भाकरी खाण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.
बॉक्स
जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले
पूर्वी खरीप व रब्बी हंगामात वरोरा, राजुरा, कोरपना, जिवती, घुग्घुस आदी तालुक्यात ज्वारीचे उत्पादन घेण्यात येत होते. मात्र आता उत्पादनात घट झाली आहे. याउलट सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या पेऱ्यांमध्ये वाढ होत आहे. रब्बी हंगामात काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. तर खरीप हंगामात ज्वारीचे उत्पादन नाहीच्या प्रमाणात आहे.