शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

टाकाऊ वस्तूंपासून पेरणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 6:00 AM

पावसाळ्यात वापसा (वाळाणी) लवकर येत नसल्याने औताद्वारे पिकाला रासायनिक खत देता येत नाही. वेळेवर मजूरसुद्धा उपलब्ध होत नाही. यासाठी प्रा.विलास कोटगिरवार यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे रासायनिक खत पेरणी यंत्र तयार केले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । भद्रावतीतील शेतकऱ्यांनी उघडले प्रगत शेतीचे नवे दालन

सचिन सरपटवार।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शेती बेभरोशाची आहे. तोट्यात आणणारी आहे, असे म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र नवनवीन तंत्रज्ञान वापरून आधुनिक शेतीद्वारे आर्थिक स्थिती मजबुत करता येते, हे येथील शेतकरी विलास कोटगिरवार यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान शेतात वापरलेच, सोबतच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ खत पेरणी यंत्र तयार केले आहे. या पेरणी यंत्राद्वारे त्यांनी शेतकऱ्यांसमोर प्रगत शेतीसाठी नवे दालन उघडले आहे.पावसाळ्यात वापसा (वाळाणी) लवकर येत नसल्याने औताद्वारे पिकाला रासायनिक खत देता येत नाही. वेळेवर मजूरसुद्धा उपलब्ध होत नाही. यासाठी प्रा.विलास कोटगिरवार यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे रासायनिक खत पेरणी यंत्र तयार केले आहे. त्यामुळे मजुरांकरवी रासायनिक खत देण्यापेक्षा या खत परेणी यंत्राद्वारे रासायनिक खत देता येते व नंतर डवऱ्याद्वारे रासायनिक खत जमिनीत गाडता येते. प्रा. विलास कोटगिरवार यांची भद्रावती ते तेलवासा रस्त्यालगत स्वत:ची शेती आहे. त्यांनी भंगारमध्ये टाकलेला हायटेक फवारणी पंप घेतला. त्याची फक्त टाळी तेवढी घेतली. बाकी सर्व जोडणी काढून टाकली. पंपाच्या टाकीला मागच्या बाजूने खाली छिद्र पाडून पाऊन इंची पिव्हीसी एमटीए बसविले. रासायनिक खत नियंत्रित करण्याकरिता त्याला एक व्हॉल्व बसविला. त्याखाली पाऊन इंची टी लावली. टिच्या बाजूला रिड्युसर बसवून त्याला रिड फटरबरी पाईप बसविला व पुढे अर्धा इंची पिव्हीसी पाईप चार फूट दोन्ही बाजूने बसवून रासायनिक खत देण्याचे पेरणी यंत्र तयार केले. यासाठी त्यांना फक्त ३५० ते ४०० रुपये खर्च आला. पंपामध्ये रासायनिक खत टाकण्यासाठी ग्लायफोसेरची पाच लिटरची कॅन खालून कापून चाडी म्हणून वापरण्यात आली. प्रा.विलास कोटगिरवार यांनी अत्यंत कमी खर्चात तयार केलेल्या या यंत्राचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होवू शकतो.एकीकडे शेती परवडत नाही, अशी बोंब होत आहे. मात्र पूर्ण वेळ शेती व्यवसायात गुंतून त्यात नवनवीन बदल व नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती फायद्याची ठरू शकते.

टॅग्स :agricultureशेती