शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाव पडल्याने सोयाबीन उत्पादन अडचणीत

By admin | Published: October 25, 2014 10:37 PM

सर्वत्र दिवाळीचे फटाके आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी सुरू असताना शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच साजरी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या

लखमापूर : सर्वत्र दिवाळीचे फटाके आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी सुरू असताना शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच साजरी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची वाढ खुंटली. यातच दरवर्षी दिवाळी सणाआधी कापूस व सोयाबिन पिकाने घर भरुन दिसायची मात्र यावर्षी शेतकऱ्यांची घरे रिकामी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. काही सिंचनाखालील जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पादन निघाले आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत उत्पादनक्षमता कमालिची घसरली आहे. बाजारात संध्या कापसाला ३७०० रुपये तर सोयाबिनला २२०० ते २८०० रुपये भाव आहे. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कवडीमोल भावात मालाची विक्री करावी लागत आहे.गेल्या दोन वर्षापासून कधी पावसाने तर कधी पुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि यावर्षी पाऊसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यात ओलिताची सुविधा असणारे शेतकरी पाणीपुरवठा करीत आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. दरवर्षी शेतीपयोगी खताच्या बियाण्यांच्या आणि किटकनाशकाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होताना दिसते. त्यामुळे एकरी उत्पादन खर्च १५ ते २० हजारांपर्यंत जात आहे. शेतात काम करणाऱ्या गडीमाणसाचे वार्षिक संकट ७० ते ८० हजार तर कुठे एक लाखापर्यंत आहे. मजुरांच्या मजुरीतही कमालीची वाढ झाली आहे. या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाची भाववाढ ठप्प आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन केव्हा येणार असाही सूर आता शेतकऱ्यांमध्ये आळवला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज घेऊन हंगामाची सुरुवात केली. दुबार -तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. आता पीक घरात नसल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. पाऊसच नसल्याने व जमिनीतील पावसाची पातळी कमी होत असल्याने ओलीत करणारा शेतकरी चिंतेत सापडला आहे. पाण्याअभावी झाडांना फळधारणा अत्यल्प दिसत आहे. याचा परिणाम निश्चितच उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात काही मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. यात कोरपना तालुक्यातील कापूस खरेदी डबघाईला आली आहे. त्यामुळे यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना कापसाची खरेदी विक्री करावी लागणार आहे. उत्पादन कमी असल्याने वाहन खर्च करणे शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरणार असल्याचे दिसते. दिवाळी अंधारात जात असतानाच शेतकऱ्यांचे दिवाळेही निघण्याची वेळ आली आहे. शासन शेतकऱ्यांसाठी योजनांचा काय पाऊस पाडते हे येणारा काळच ठरवेल. (वार्ताहर)