कोरोना बाधितांमध्ये दररोज होणाऱ्या वाढीमुळे व वेळोवेळी राज्य सरकारद्वारा घोषित संचारबंदीमुळे वाहनाने विनाकारण फिरणाऱ्यांवर बंधन आले आहे. नागरिक अत्यावश्यक कामासाठीच वाहन बाहेर काढतात. यामुळे वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर जाण्यावर ब्रेक लावला आहे. बल्लारपूर व बामणी शहरात आठ पेट्रोलपंप आहेत. येथे ट्रान्सपोर्ट व्यवसायी, ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक व घरोघरी दुचाकींची संख्या जास्त असल्यामुळे पेट्रोल पंपावर दिवसभर गर्दी असायची. परंतु जेव्हापासून कोरोनाचे संकट आले तेव्हापासून पेट्रोल पंपावर होणाऱ्या गर्दीला ब्रेक लागला आहे. ५० टक्केच वाहन रस्त्यावर असल्यामुळे पेट्रोल पंप व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
कोट
संचारबंदी काळात कोरोना नियमाचे वाहनचालक पालन करीत असल्यामुळे पंपावरील गर्दी कमी झाली आहे. यामुळे व्यवसाय अर्ध्यावर आला आहे. कोरोना संकटामुळे ट्रान्सपोर्टच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. पेट्रोलच्या विक्रीसोबत डिझेलची विक्रीही थंडावली आहे.
- अश्विन झुल्लुरवार, पेट्रोल पंपचे संचालक, बल्लारपूर.