लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ब्रह्मपुरी येथील राहुल हाडगे हा ३५ वर्षीय तरुण तर कोजबी येथील ५३ वर्षीय दयानंद गोपाले यांचे पाय क्षुल्लक कारणावरून निकामी झाले. चालता येईना. मात्र शस्त्रक्रियेने दोघांचेही पाय पूर्ववत होऊन त्यांना पायदळ मुक्तसंचार करता येईल, असे माहित होताच आ. कीर्तीकुमार भांगडिया त्यांच्या मदतीला धावून आले. राहुल हाडगे यांचे हीप रिप्लेसमेंट आणि दयानंद गोपाले यांच्यावर क्नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आले. यामुळे दोघांचेही थांबलेले पाय चालू लागले.राहुल हाडगे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यात त्यांचे डाव्या पायांचे हीप खराब झाले. नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांना हीप जॉइंट रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया सांगितली. मात्र शस्त्रक्रियेचा खर्च त्यांना पेलवणारा नसल्याने त्यांनी शस्त्रक्रिया केली नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनात निराशा पसरली. अशातच पाहर्नी ता. नागभीड येथील भाजपाचे कार्यकर्ते लहू भाजीपाले यांनी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यासमोर त्यांची व्यथा मांडली. लाखो रुपयांच्या खर्चाला आमदार भांगडिया यांनी एका शब्दात होकार दिला.दयानंद गोपाले यांच्या बाबतीतही तेच झाले. वयोमानानुसार शरिरातील अवयव हळूहळू निकामी होत असते. गोपाले यांच्या डाव्या पायाचे गुडघे खराब झाले. त्यांना चालता येईना. कोजबी येथील काही कार्यकर्त्यांनी गोपाले यांचीही व्यथा आ.भांगडिया यांच्याकडे मांडली. यावेळीही त्यांनी शस्त्रक्रियेसाठी वाट्टेल ती मदत करायला तयारी दर्शविली. त्यानुसार दोघांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता दोघेही चालू लागले असून त्यांच्या पायाला जणू गतीचे चक्रच मिळाले आहे.
अन् त्यांच्या पायांना मिळाली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:31 AM
ब्रह्मपुरी येथील राहुल हाडगे हा ३५ वर्षीय तरुण तर कोजबी येथील ५३ वर्षीय दयानंद गोपाले यांचे पाय क्षुल्लक कारणावरून निकामी झाले. चालता येईना. मात्र शस्त्रक्रियेने दोघांचेही पाय पूर्ववत होऊन त्यांना पायदळ मुक्तसंचार करता येईल, असे माहित होताच आ. कीर्तीकुमार भांगडिया त्यांच्या मदतीला धावून आले.
ठळक मुद्देदिलासा : निकामी पाय शस्त्रक्रियेने पूर्ववत