लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शनिवारी प्रारंभ झाला. यानिमित्त लोकमत वृत्तपत्र समूह आणि इंडियन मेडिकल असोसिशनच्या संयुक्त विद्यमाने गंजवॉर्ड येथील आयएमए सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक व स्वयंसेवी संघटना, क्रीडाप्रेमी, युवक-युवतींनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराचे उद्घाटन आयएमएचे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार यांनी केले. प्रमुख पाहुणे चंद्रपूर बचाव संघर्ष समिती अध्यक्ष डॉ. गोपाल मुंदडा, लोकमत परिवाराचे ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा, रमन बोथरा, माजी नगरसेवक नंदू नागरकर, जल बिरादरी प्रमुख संजय वैद्य, जितेंद्र चोरडिया, लोकमतचे शाखा व्यवस्थापक विनोद बुले, जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर उपस्थित होते. या मान्यवरांनी वाहिली आदरांजलीमाजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, माजी खासदार नरेश पुगलिया, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा अतिरिक्त आयुक्त विपिन पालीवाल, माजी नगराध्यक्ष डाॅ. सुरेश महाकुलकार व सुनिता लोढीया, ॲड. बाबासाहेब वासाडे, एमएसपीएमचे संस्थापक पांडुरंग आंबटकर, सीए हर्षवर्धन सिंघवी, गिरीष चांडक यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाला रोटी बँक लंगर समितीचे अध्यक्ष तसेच कडूघास सेवा समिती व आपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू चौरिया, लोकमत सखी मंच संयोजिका सोनम मडावी, कॅम्पस क्लब संयोजक शुभम सिंग, सखी मंचच्या पौर्णिमा डाहुले, सुजाता बल्ली, सीमा वनकर, मनीषा आंबेकर, मंदा पडवेकर, सोनाली धनमने आदींनी सहकार्य केले.
हे आहेत रक्तदाते - परिमल डोहणे, बंडू धोतरे, डॉ. विश्वास झाडे, संजय वैद्य, महेश काहीलकर, धर्मेद्र लुनावत, अनिल अडगनलवार, राजू हेडगे, मंदा पडवेकर, रूपेश ताजणे, डॉ, अंकिता वाळके, आशू सागोले, राहुल बोधे, तेजस गावतुरे, शिवशंकर हनुवटे, उत्तम गंडाटे, श्रुती खोब्रागडे, प्रवीण उपरे, जितेंद्र धकाते, शुभम घोडमारे, सुभाष भटवलकर, उमाकांत घोडेस्वार, राजू चौरिया, पल्लवी टोंगे, राम धनमने, रामेश्वर सरवाडे आदींनी रक्तदान केले.
कर्तृत्वसंपन्न जीवनसाधनेसमोर कृतज्ञतालोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींनी ‘लोकमत’च्या नि:स्पृह पत्रकारितेची पायाभरणी केली. त्याच ध्येयाने अविरत वाटचाल सुरू असल्याच्या आठवणींना चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उजाळा दिला आणि बाबूजींच्या कर्तृत्वसंपन्न जीवनसाधनेसमोर कृतज्ञता व्यक्त करून आदरांजली अर्पण केली.