शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

चंद्रपूरात उत्स्फूर्त, ग्रामीण भागात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 5:00 AM

चंद्रपूरात किसान आंदोलनाच्या नेतृत्वात पंजाबी बांधवांनी काढलेली ट्रॅक्टर रॅली लक्षवेधी ठरली. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस जिल्हाध्यक्ष   (ग्रामीण) प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, काँग्रेस शहर अध्यक्ष रामु तिवारी, राकाँ  शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, सुभाष गौर, नंदू नागरकर, सुनिता लोढीया व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

ठळक मुद्देकेंद्रीय कृषी कायद्यांविरूद्ध संताप : पदयात्रा, ट्रॅक्टर, दुचाकी रॅली, सभा व निवेदनांद्वारे निषेध

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे अन्यायकारक असल्याचा आरोप करून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला मंगळवारी जिल्ह्यातील शहरी उत्स्फूर्त  प्रतिसाद होता, तर ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलनाला महाविकास आघाडीने पाठींबा देऊन पदयात्रा, ट्रॅक्टर व दुचाकीरॅली काढली. केंद्र सरकारविरूद्ध प्रत्येक तालुक्यात निषेध सभा घेतल्या. जिल्हा प्रशासनाला निवेदने देऊन शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी केली. व्यापाऱ्यांनीही बंदला सहकार्य करून दुकाने बंद ठेवली. मात्र, जीवनाश्यक दुकाने सुरू होती. बंददरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडली नाही.शेतकऱ्यांच्या देशव्यापी भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अन्य समविचारी पक्ष  एकत्र आले. चंद्रपूर शहरासह सर्व तालुकास्थळ व ग्रामीण भागातही  भारत बंदला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. चंद्रपूरात किसान आंदोलनाच्या नेतृत्वात पंजाबी बांधवांनी काढलेली ट्रॅक्टर रॅली लक्षवेधी ठरली. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस जिल्हाध्यक्ष   (ग्रामीण) प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, काँग्रेस शहर अध्यक्ष रामु तिवारी, राकाँ  शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, सुभाष गौर, नंदू नागरकर, सुनिता लोढीया व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात  गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांवर काळे कायदे लादत असल्याचा आरोप पुगलिया यांनी केला. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारविरूद्ध नारेबाजी करू उपविभागीय अधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले. निवेदनामध्ये बाजार समित्यांचे अस्तित्व कायम ठेवून चुकीचे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. ( पान २ वर)

व्यापाऱ्याकडून स्वयंस्फुर्तीने बंद मूल :  भारत बंददरम्यान येथील व्यापाºयांनी स्वयंस्फुर्तीने पाठींबा दिला. फुटपाथसह सराफा, किराणा, कापड, फळ व भाजी बाजारही कडकडीत बंद होता. गांधी चौकात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, काँग्रेसचे जिल्हा महासचिव राकेश रत्नावार, शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन येरोजवार, समता परिषदेचे प्रा. विजय लोनबले, राकाँचे तालुकाध्यक्ष गंगाधर कुनघाडकर, आपचे तालुकाध्यक्ष अमित राऊत, काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष रूमदेव गोहणे, उलगुलान संघटनेचे निखील वाढई, नगरसेवक विनोद कामडी, सुरेश फुलझेले, कैलास चलाख  उपस्थित होते. ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांनी बंददरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता. 

राजुऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसादराजुरा : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने शहरात कडकडीत बंद पाळला.  शहर व तालुक्यातील अत्यावश्यक सेवा सोडून अन्य व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. पंचायत समिती चौकातून दुचाकी रॅली काढण्यात आली. पं. स. उपसभापती मंगेश गुरनुले,  युवक काँग्रेस अध्यक्ष एजाज अहमद, कवडू सातपुते, विकास देवाळकर, धनराज चिंचोलकर, लहू चहारे, भाऊराव आकनूरवार, प्रा. प्रफुल्ल शेंडे, सय्यद साबीर, शाहनवाज कुरेशी, आकाश मावलीकर, राकाँचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, आशिफ सय्यद, शहराध्यक्ष आसिष येमनुरवार, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मेहमुद मुसा, राजु गदगाळ उपस्थित    होते.  

बल्लारपुरात शुकशुकाट बल्लारपूर : येथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदला पाठींबा दिला. त्यामुळे सकाळपासून रस्त्यावर शुकशुकाट होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदसमोर केंद्र सरकारविरूद्ध घोषणाबाजी केली. यावेळी घनश्याम मुलचंदानी, अब्दुल करीम, दिलीप माकोडे, इस्माईल ढाकवाला, छाया मडावी, अ‍ॅड. मेघा भाले, अफसाना सय्यद, शाहजादी अंसारी, शिवसेनाचे सिक्की यादव, बाबा साहू, राकाँचे बादल उराडे, उलगुलान संघटनेचे राजू झोडे, पवन भगत, संपत कोरडे, सचिन पावडे, भगतसिंग झगडे, जाकीर खान, मनोज बेले, नरेश डोंगरे, भूषण पेटकर, स्नेहल साखरे, अनिरूप पाटील उपस्थित होते.  तहसीलदारांना निवेदनगोंडपिपरी : काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, यंग ब्रिगेडने शहरात बंद पाळून तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुरज माडूरवार, निकेश बोरकुटे, गौरव घुबडे, माजी उपसरपंच अमित फरकडे, प्रमोद दुर्गे, संतोष उराडे, नभात सोनटक्के, नंदकिशोर बोरकुटे, प्रशांत कोसनकर, प्रतिक फलके, वैभव गिरसावळे, रितेश बट्टे, प्रदीप झाडे उपस्थित होते. धाबा येथे माजी सरपंच नामदेव सांगडे, सचिन फुलझले, प्रवीण मेश्राम, रामकृष्ण सांगडे, अरूण बोरकर, सोनू झाडे, संतोष मुप्पीडवार, प्रदीप खारकर आदींनी बंदसाठी पुढाकार घेतला होता.

भद्रावतीत १०० टक्के बंद, शेतकऱ्यांचा सहभागभद्रावती : शेतकºयांनी पुकारलेल्या भारत बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बसपा, बीआरएसपी, भाकपा, भारिपचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी बंदसाठी पुढाकार घेतला. शहरातून दुचाकी रॅली  काढून केंद्र्र सरकार निषेध केला.  नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुनाज शेख, पांडुरंग टोंगे, भगतसिंग मालुसरे,  प्रफुल्ल चटकी, सुधीर सातपुते, संतोष आमने, सुरज गावंडे, राजू गैनवार, विशाल बोरकर, सुनील खोब्रागडे, प्रवीण महाजन, विकास दुर्योधन, दिलीप मांढरे, अजित फाडके, मितवा पाटील आदींनी बंदसाठी आवाहन केले होते.

बाजारपेठ व कृषी उत्पन्न बाजार समिती बंदवरोरा : येथील बाजार समितीचे कामकाज बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला. शहरातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी शहरातून दुचाकी रॅली काढून केंद्र  काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकाच्या कृषी धोरणाविरूद्ध नारेबाजी केली. बंदला पाठींबा देण्यासाठी कार्यक्रर्ते व्यापाºयांना आवाहन करत होते.

यंग चांदा ब्रिगेडचा भव्य मोर्चासमर्थनार्थ यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, महिला आघाडी शहर संघटीका वंदना हातगावकर, कलाकार मल्लारप,रविन्द्र लोनगाडगे सरपंच, ग्रा. पं. दाताळा, युवा नेते अमोल शेंडे, विश्वजीत शाहा, वीज कामगार संघटनेचे अध्यक्ष हरमन जोसेफ, विदयार्थी शहर संघटक अजय दुर्गे, राहुल मोहुर्ले, पुण्यवर्धन मेश्राम, मुन्ना जोगी आदींनी बंदला सहकार्य केले. गांधी चाैकात सभा झाली.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप