नागभीड : ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत वृत्तपत्र समूह, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर या़ंच्या वतीने शनिवारी नागभीड येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाकाळातही ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या हस्ते झाले. नगराध्यक्ष प्रा. उमाजी हिरे हे अध्यक्षस्थानी होते. पंचायत समितीचे सभापती प्रफुल्ल खापर्डे, उपनगराध्यक्ष गणेश तर्वेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवेश पठाण, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी गावंडे, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय गजपुरे, नागभीड व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्माणी, नगर परिषदेचे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, नगरसेवक प्रतीक भसीन, राष्ट्रवादीचे मंगेश सोनकुसरे, ‘प्रहार’चे वृषभ खापर्डे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरास व्यापारी संघ नागभीड, नागभीड तालुका केमिस्टस अँड ड्रगिस्टस संघटना, आपुलकी फाउंडेशन, खैरे कुणबी समाज संघटना, लोकमत सखी मंच, झेप निसर्ग संस्था, आशा वर्कर संघटना, म.रा. जुनी पेन्शन हक्क संघटना यांचे सहकार्य लाभले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी घनश्याम नवघडे, तळोधीचे प्रतिनिधी संजय अगडे, ‘लोकमत सखी मंच’च्या संयोजिका रजनी घुटके, किरण गोडे, योगिता मिसार, कुंदा देशमुख, सोनाली खनके, रेखा देशमुख, मनीषा बागडे, हर्षा जांभुळे, राणी मुंगणकर, शीतल जांभुळे, ग्रामीण रुग्णालयाच्या प्रतिभा भोगेकर, वर्षा खोंड, संगीता नवले, कृपाली बोरकर यांचे सहकार्य मिळाले.
बॉक्स
यांनी केले रक्तदान
जितू वानखेडे, बालू चिलमवार, ऋषभ खापर्डे, नीलम डोमळे, राजेंद्र बेहरे, तुषार निनावे, पराग भानारकर, अरुण गायकवाड, पुरुषोत्तम बगमारे, गणेश गड्डमवार, टाकेश्वर कोडापे, आशिष कामडी, सागर डोईजड, स्वप्निल मेश्राम, मनीष करकाडे, हर्षल जीवतोडे, तुषार ताकपल्लीवार, शुभम देशमुख, प्रवीण लटारे, योगिता मिसार, राकेश साखरकर, मंगेश साखरकर, मयूर जांभुळे, विजय कावडकर, अखिल घुटके, निखिल घुटके, राकेश जक्कनवार, दिनकर संदोकर, कुणाल मुलमुले, महेश कुंभरे, कुणाल टोंगे, सौरभ मिसार, वैभव कुंभरे, गोपाल मोहनकर, नंदेश्वर सातपैसे, सूरज चिलबुले, नितीनकुमार अनरसकर, मंगेश सोनकुसरे, संदीप गोन्नाडे, दीपक बनकर, विकास जक्कनवार, प्रबुद्ध मुलमुले, गुलाब गोन्नाडे, अनिल चिलमवार, राहुल मुलमुले, प्रशांत बेंदेवार.
बॉक्स
गटविकास अधिकारी यांची रक्तदानाची इच्छा
नागभीडच्या गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे या स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी आल्या. मात्र वैद्यकीय कारणास्तव त्यांना रक्तदान करता आले नाही. यावेळी खोचरे यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले.
तळोधी येथेही शिबिर
१२ जुलै रोजी तळोधी (बा.) येथेही ‘लोकमत’कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘लोकमत- रक्ताचं नातं’ या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’चे प्रतिनिधी संजय अगडे, सावरगावचे प्रतिनिधी राजेश बारसागडे, सखी मंच संयोजिका संगीता अगडे यांनी केले आहे.
100721\img_20210710_131935.jpg
प्रमाणपत्र वितरित करतांना गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे