ब्रह्मपुरी : लोकमतचे संस्थापक संपादक तथा स्वातंत्र संग्राम सैनिक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियानांतर्गत बुधवारी येथील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष रिता उराडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. अतुल देशकर, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे संचालक फादर जोसेफ कलथील, पोलीस निरीक्षक रोशन यादव, तहसीलदार विजय पवार, संवर्ग विकास अधिकारी डॉ. शिरीष रामटेके, लोकमत सखी मंच संयोजिका स्नेहा गोस्वामी यांची उपस्थिती होती. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. नितीन चव्हाण, हरिश्चंद्र तलमले, अर्चना राऊत, रिता पाटील, लिंसी, प्रा. सुयोगकुमार बाळबुद्धे, स्वप्निल अलगदेवे, प्रमोद फटिंग, अजय डांगे, अल्का खोकले, साधना केळझरकर यांनी परिश्रम घेतले आहे.
बॉक्स
खाकी गणवेशात रक्तदान
तीन फोटो वापरणे
ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पीएसआय सुरेंद्र उपरे व उत्तर वनपरिक्षेत्राधिकारी आशुतोष मेंढे यांनी आपल्या खाकी गणवेशातच रक्तदान केले. यासोबतच ब्रह्मपुरीचे तहसीलदार विजय पवार यांनीही रक्तदान करून उपस्थितांचा उत्साह वाढविला.
बॉक्स
हे आहेत रक्तदाते
तहसीलदार विजय पवार, पीएसआय सुरेंद्र उपरे, उत्तर वरपरिक्षेत्राधिकारी आशुतोष मेंढे, प्रा. नितीन पोटे, डॉ. नरेश देशमुख, प्रा. सुयोगकुमार बाळबुद्धे, शुभम खोब्रागडे, प्रवीण भोयर, विकास दोडके, प्रशांत नाकतोडे, देवेंद्र सपाटे, मुराद पंजावणी, रवींद्र ठाकरे, कुणाल राऊत, हेमराज फटींग, विलास रामटेके, योगेश चौधरी, अश्विन रंगारी, संजय बट्टे, गोवर्धन सारये, प्रल्हाद बालपांडे, मुकेश गजभे, भूषण खानोरकर, अमित मांढरे, अनिल प्रधान, प्रफुल्ल चीचमलकर, हेमंत रामटेके, आफ्रिन रय्यानी, अभिजित कोसे, निखील करंबे, प्रशांत रामटेके, संदीप बगमारे, श्यामराव नेवारे, अनिल तलमले, मंगेश खेवले.
140721\187-img-20210714-wa0035.jpg
रक्तदान शिबीर