शहरातील कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यातील अन्य शहराच्या तुलनेत पुढे गेली. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट व्हावी व संसर्गाची साखळी तुटावी, याकरिता शहरात सहा दिवसासाठी जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. पहिल्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील जीवनाश्यक वस्तू व औषधांची दुकाने वगळून सर्व दुकाने व आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शहरातील नागरिकही घराबाहेर निघाले नाही.
शहरात सर्वत्र शुकशुकाट
मुख्य बाजारपेठ बंद असल्याने ग्रामीण भागातील जनता शहरात आली नाही. त्यामुळे सर्व रस्त्यावर शुकशुकाट होता. जनता कर्फ्यू सुरू होणार असल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांनी आदल्या दिवशीच वस्तू खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. मास्क न लावता विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर नगर परिषद व पोलीस प्रशासनाने केली. पहिल्याच दिवशी जसा प्रतिसाद दिला तो शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहिल्यास कोरोना संसर्गाची संख्या कमी होऊ शकते, अशी चर्चा झाली आहे.