शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

बिबी येथील तालुकास्तरीय पशुप्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: March 28, 2017 12:32 AM

पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व पंचायत समिती कोरपना यांच्यावतीने कोरपना तालुक्यातील बिबी येथे रविवारला तालुकास्तरीय पशुप्रदर्शनी पार पडली

विविध प्रजातीच्या पशू : विजेत्यांना बक्षिसाचे वितरणंकोरपना : पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व पंचायत समिती कोरपना यांच्यावतीने कोरपना तालुक्यातील बिबी येथे रविवारला तालुकास्तरीय पशुप्रदर्शनी पार पडली पशु प्रदर्शनीला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो पशूंनी सहभाग घेतला.प्रदर्शनीचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती श्याम रणदिवे यांचे हस्ते पार पडले. तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे उपस्थित होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून जि.प. सदस्य कल्पना पेचे, विना मालेकर, पंचायत समिती सदस्य सविता काळे, रुपाली तोडासे, सहा. संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, बिबीचे सरपंच मंगलदास गेडाम, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, लखमापूरचे उपसरपंच मोरेश्वर आस्वले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, नांदा ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत, रमेश पाटील मालेकर, ग्रामविकास अधिकारी अरुण वाकुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित पाहुणे मंडळींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. संकरीत गाय वर्ग गटातून प्रथम क्रमांक भीमराव आंबोरे, द्वितीय क्रमांक सदाशिव थेरे, तृतीय क्रमांक विलास तडसे, देसी गावठी गाय वर्ग गटातून प्रथम क्रमांक मोरेश्वर आस्वले, द्वितीय क्रमांक कवडू चटप, तृतीय क्रमांक देवराव गिरडकर, संकरीत वासरे गटातून प्रथम क्रमांक संजू सातघरे, द्वितीय क्रमांक विकास धोंगळे, तृतीय क्रमांक दादाजी आस्वले, देसी गावठी वासरे गटातून प्रथम क्रमांक संतोष कोडापे, द्वितीय क्रमांक राजेंद्र देरकर, तृतीय क्रमांक अशोक हाके, म्हैस गटातून प्रथम क्रमांक तुळशीराम मोरे, द्वितीय क्रमांक पांडुरंग मोरे, तृतीय क्रमांक ज्ञानेश्वर मोरे, बकरी गटातून प्रथम क्रमांक दीपक बोबडे, द्वितीय क्रमांक सोनेराव कुळमेथे, तृतीय क्रमांक महादेव पवार बोकड गटातून प्रथम क्रमांक साहिल शेख, द्वितीय क्रमांक शशिकांत देवकते, तृतीय क्रमांक किशोर आस्वले, कुक्कुट गटातून प्रथम क्रमांक पंकज जेऊरकर, द्वितीय क्रमांक अनिल महाजन व तृतीय क्रमांक सुरेश बल्लावार यांनी पटकाविला. कार्यक्रमाचे संचालन पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. के. महाजन यांनी तर आभार डॉ. एस.एम. शेंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेकरिता कोरपना तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत कार्यालय बिबी व तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)