लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरी व ग्रामीण भागात लालपरी म्हणून परिचित असलेल्या एसटी बसगाड्यांनीही कात टाकणे सुरु केले आहे. खाजगी ट्रॅव्हल्स बसची ज्या प्रमाणे एजंट स्पॉट व अॅडव्हॉन्स बुकिंग करतात, त्याच प्रमाणे एसटी महामंडळाने जिथे बसस्थानक नाही, परंतु थांबा आहे, अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन स्पॉट व अॅडव्हान्स बुकींग करणे सुरु केले आहे.स्पर्धेच्या युगात एसटी बस मागे पडत आहे. प्रवाशांची संख्या रोडाविल्याने एसटी महामंडळ तोट्यात चालत असल्याची ओरड सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांनी एसटी बसने प्रवास करावा याकरिता एसटी महामंडळ अनेक नवनवीन उपाय योजना आखत आहे. तर काही कडक नियमही लावण्यात आले आहे. मात्र या नियमांना खासगी प्रवासी वाहतूकधारक बगल देत एसटीचे प्रवाशी पळवून नेत असल्याने एसटी महामंडळास प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. ज्या ठिकाणी एसटी व खाजगी बसचे थांबे आहेत. त्या ठिकाणी खाजगी बसचे एजंट एसटी बसला प्रवासी मिळू देत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसते. खाजगी बसधारक एजंट मार्फत प्रवासी मिळवत असताना वरोरा शहरातील नागपूर, चंद्रपूर मार्गावरील रत्नमाला चौकात एसटी महामंडळाने एक कर्मचाºयाची नियुक्ती केली आहे. हा गणवेशधारी कर्मचारी उभे असलेल्या प्रवाशांना जवळ जावून कुठे आयचे आहे, अशी विचारणा करीत एसटी बस किती वेळात येणार, याची माहिती प्रवाशांना देतो. व त्यांना त्या ठिकाणचे अॅडव्हॉन्स तिकीट देवून एसटी बस आल्यानंतर प्रवाशांना त्याच एसटी बसमध्ये बसविण्याची कार्यवाही मागील काही दिवसांपासून पार पाडत आहे. यामुळे काहीसा खाजगी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.एसटीमध्ये सीट मिळेल काय ?एसटी थांब्याजवळ नियुक्त एसटी कर्मचारी भद्रावती व वरोरा बसस्थानकाशी सातत्याने भ्रमनध्वनीवर संपर्क साधून बस या वेळात पोहचणार याची माहिती देत प्रवाशांची बुकींग करतो. परंतु, त्या एसटी बसमध्ये किती प्रवाशी आहेत, याची अचुक माहिती सदर कर्मचाºयास नसते. त्यामुळे सिझनमध्ये अशी बुकिंग केल्यास बसमध्ये प्रवाशाला सीट मिळेलच याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवाशाला हमखास सीट मिळाली पाहिजे, याचे नियोजन एसटी महामंडळाने करणे गरजेचे आहे.
एसटी बसगाड्यांचीही स्पॉट व अॅडव्हान्स बुकिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 10:17 PM
शहरी व ग्रामीण भागात लालपरी म्हणून परिचित असलेल्या एसटी बसगाड्यांनीही कात टाकणे सुरु केले आहे. खाजगी ट्रॅव्हल्स बसची ज्या प्रमाणे एजंट स्पॉट व अॅडव्हॉन्स बुकिंग करतात, त्याच प्रमाणे एसटी महामंडळाने जिथे बसस्थानक नाही, परंतु थांबा आहे, अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन स्पॉट व अॅडव्हान्स बुकींग करणे सुरु केले आहे.
ठळक मुद्देवरोरा आगार : प्रवासी मिळविण्यासाठी महामंडळाचा उपक्रम