लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : अमावस्येच्या काळोखात रात्री कापूस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडी व बोंड अळीचे पंतग मोठ्या प्रमाणात अंडी देतात. चार ते पाच दिवसात अंडीमधून अळी तयार होते. कापसाच्या हिरव्या पानाचे, पात्याचे व फुलांचे नुकसान करतात. त्यामुळे अमवास्यानंतर तीन ते चार दिवसात किटक नाशकाची फवारणी करावी, यामुळे अळी नियंत्रणात येण्यास मदत होते, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक विजय काळे यांनी केले आहे.तालुक्यातील अर्जुनी येथे आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांची शेती शाळा, आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. शेतकºयांना कापूस पिकावरील किडी, कमी खर्चात फवारणीचे नियोजन, कीड नियंत्रक, किटक नाशकाचा वापर आदीबाबत यावेळी मार्गदर्शन केले. कापूस पिकावरील रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी अळी, फूल किडे पात्यातील रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा पिवळ्या पडतात. प्रार्दूभाव वाढल्यास पाने करपतात. बोंड अळीमधील गुलाबी बोंड अळीची सुरुवात कापासाच्या झाडाला पहिले फूल लागल्यानंतर होते. गुलाबी बोंड अळीचा पतंग पानाच्या खालच्या बाजूस अंडी घालते. अंडीमधून बारिक अळी निघून फुलाच्या कळीवर येवून पाकळ्या वरुन बंद करते या अवस्थेला डोम अळी म्हणतात. अळी बोंडातील सरकी खाते त्यामुळे पिकाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.कोठारीत बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शनकोठारी : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नीत नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित कृषी महाविद्यालय दारव्हा येथील कृषी दुतांनी ग्रामीण जागृकता कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन केले. केरोसिन ट्रॅप त्याचा वापर व फायदे, ट्रॅपचा वापर केला असता किडींवर कोणता परिणाम होतो. अमेरिकन बोंड अळी व गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्राचार्य एन. बोबडे, कार्यक्रम अधिकारी पी. ए. खाडे यांनी कृषी दूतांसह शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संकेत बुटले यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमावस्ये नंतरच करा कपाशीवर फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 5:00 AM
तालुक्यातील अर्जुनी येथे आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांची शेती शाळा, आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. शेतकºयांना कापूस पिकावरील किडी, कमी खर्चात फवारणीचे नियोजन, कीड नियंत्रक, किटक नाशकाचा वापर आदीबाबत यावेळी मार्गदर्शन केले. कापूस पिकावरील रस शोषण करणाºया मावा, तुडतुडे, पांढरी अळी, फूल किडे पात्यातील रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा पिवळ्या पडतात.
ठळक मुद्देकृषी विभाग : अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना सल्ला