कोरपना : गुरुवारी खैरगाव येथे विनापरवानगी जिलेटीनचा वापर होत असताना धाड टाकून जिलेटीन स्फोटक जप्त करण्यात आले. यात संशयित आरोपीच्या शोधात शुक्रवारी शोध पथके रवाना करण्यात आले आहे.
जलस्वराज्य विहिरीच्या कामाच्या ब्लास्टिंगसाठी विनापरवानगी जिलेटीन स्फोटके वापरण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ही धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण १८ नग जिलेटीन व ट्रॅक्टर, बॅटरी, इलेक्ट्रिक वायर असा सात लाख पाच हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. कोरपना हा नक्षलग्रस्त परिसर असताना व परवानगी अनिवार्य असताना अनधिकृतपणे या स्फोटकाचा वापर होत होता. ठाणेदार अरुण गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वातील पथक आरोपीच्या मार्गावर रवाना झाले आहे.