गौरव स्वामी
वरोरा : एसटी महामंडळाच्या डिजिटल तिकीट मशीन बहुतांश नादुरुस्त अवस्थेत असल्याचे दिसते. सर्वत्र डिजिटल इंडियाचा गाजावाजा होत असताना एसटी महामंडळामध्ये मात्र आणखी आता पूर्वीच्याच पारंपरिक ट्रे तिकिटांचा वापर केल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला एसटी महामंडळानेसुद्धा ग्राहकांच्या सोयीसाठी व वाहकांना वापरण्यास सोयीस्कर व हाताळण्यास सोपी असे डिजिटल मशिन्स दिले. यामुळे वाहकाला मशीन हाताळायला व हिशेब ठेवायला फार सोयीस्कर झाले होते. एसटी वाहकाचा बराच वेळ हा यामुळे वाचत होता. परंतु, आता बऱ्याच मशिन्स या प्रिंट व बॅटरीच्या समस्यांमुळे नादुरुस्त अवस्थेत आहेत. यामुळे आणखी जुन्या पद्धतीचे पारंपरिक तिकीट ट्रे वापरण्याची नामुष्की एसटी महामंडळावर आली आहे. यामुळे वाहकांची फार गैरसोय होत आहे.
बॉक्स
वायफाय सुविधाही बंद
प्रवाशांच्या मनोरंजन व करमणुकीसाठी एसटी महामंडळ यांनी बऱ्याचशा एसटीमध्ये वायफाय सुविधा ही लावली होती त्यासुद्धा आता बंद अवस्थेत दिसून येत आहे
कोट
बहुतांश मशीन या बिघडलेल्या आहेत. दुरुस्तीसाठी कंपनीला पाठविल्या; मात्र अजून दुरुस्ती होऊन परत आल्या नाहीत आणि ज्या सुरू आहेत त्या मशीनसुद्धाबरोबर चालत नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या तिकिटांचा वापर केला जात आहे.
- रामटेके, आगार व्यवस्थापक, वरोरा.