बॉक्स
कधी पंधरवडा, तर कधी दिवस उशिरा वेतन
कोरोनाच्या पूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन काही प्रमाणात नियमित होत होते. मात्र कोरोनाचे संकट असल्याने महामंडळाला मोठा फटका बसला. महिना भरल्यानंतर कधी दहा दिवसांनी तर कधी पंधरा दिवसांनी वेतन मिळते. काही वेळेस तर दोन महिने वेतन थकीत होते.
बॉक्स
उपचारावर झालेला खर्च आणायचा कुठून
कोरोनाबरोरबरच इतर आजाराने महामंडळातील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील लोकांना ग्रासले होते. अनेकांना रुग्णालयात भरती करावे लागले. कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या डॉक्टरांकडे औषधोपचार केला. त्याची बिलेदेखील कार्यालयामध्ये जमा केली. मात्र अद्यापपर्यंत त्याची रक्कम जमा झाली नसल्याची ओरड कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
------
वैद्यकीय बिले मिळण्यास बराच विलंब
एकीकडे कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत. कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांंना मेडिकल सुविधांची बिलेदेखील वेळेत मिळत नसल्याने कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. कोरोनाकाळात पगार बंद, आता पगार वेळेवर नाही व त्यात स्वत:चे व कुटुंबातील सदस्यांचे आजारपण याच्याकडेदेखील दुर्लक्ष होत आहे.