शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
4
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
5
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
6
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
7
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
8
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
9
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
10
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
11
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
12
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
13
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
14
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
15
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
16
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
17
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
18
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
19
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
20
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले

एसटीचा प्रवास सुरक्षित मग ट्रॅव्हल्सला पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:18 AM

एसटीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळातर्फे विविध योजना राबविण्यात येतात, परंतु महामंडळाच्या अनेक बसची हालत ...

एसटीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळातर्फे विविध योजना राबविण्यात येतात, परंतु महामंडळाच्या अनेक बसची हालत खस्ता झाली आहे. अनेकदा प्रवाशांनाच एसटीला धक्का मारण्याची वेळ आली आहे. याउलट खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांना वातानुकूलित सुविधा दिली जाते. त्यासोबतच मनोरंजनासाठी एलईटी टीव्ही, चार्जिंग करण्यासाठी प्लग आदी सुविधा दिल्या जात असून, महामंडळाच्या बसपेक्षा तिकीट कमी असते. त्यामुळे प्रवासी आपसूकच ट्रॅव्हल्सच्या प्रवासाकडे वळत आहेत. त्यातही ट्रॅव्हल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने कुठेही जायचे असल्यास अर्धा तासात सहज बस मिळते. त्यामुळे अनेक जण ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला पसंती देत आहेत.

बॉक्स

एसटीला स्पीड लॉक ट्रॅव्हल्स सुसाट

एसटी महामंडळाच्या बहुतांश बसचा स्पीड लॉक केला असतो. त्यामुळे चालकाला वाहनाची गती वाढविणे अशक्य असते. याउलट ट्रॅव्हल्स सुसाट वेगाने पळत असतात. ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेचचा स्पडी ६५ किलोमीटर प्रतितास, लांब व मध्यम पल्ल्याच्या ७० वर आणि शिवशाही ७५ ते ८० पर्यंत स्पीड लॉक करण्यात येतो. त्या तुलनेत ट्रॅव्हल्सचा स्पीड अधिक असल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सला प्राधान्य देत असतात.

कोट

एसटीतून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य

एसटीचे चालक प्रशिक्षित असतात. त्यांना सावधगिरीने वाहन चालविण्याच्या सूचना असतात, तसेच प्रवाशांसाठी महामंडळातर्फे काही योजनाही राबविण्यात येत असतात. एकदंरीत एसटीतून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे प्रवाशांची एसटीतून प्रवास करून, महामंडळाला सहकार्य करावे.

स्मिता सुतवणे, विभागीय नियंत्रक चंद्रपूर

कोट

आराम महत्त्वाचा की सुरक्षित प्रवास

बसपेक्षा ट्रॅव्हल्सचे भाडे कमी आहे. त्यातच आपणाला जिथे थांबायचे असते. तिथे ट्रॅव्हल्स थांबत असते. त्यामुळे बसपेक्षा ट्रॅव्हल्सचा प्रवास अधिक सोईचा वाटतो. त्यामुळे मी नेहमी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देत असते.

- अजित गेडाम, प्रवासी

-----

ट्रॅव्हल्समध्ये चित्रपट बघत किंवा गाणे ऐकत मनोरंजनात्मक प्रवास करता येते. याउलट बसमध्ये टीव्ही व नेटची व्यवस्था असतानाही ते कधीच सुरू दिसून येत नाही. त्यातच भाडे कमी असल्याने मी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देते.

-प्रतीश मोटघरे, प्रवासी

-----

२०१८ ६२९

२०१९ ६०७

२०२० ५६५

२०२१ १२०