लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद घेऊन तसेच प्रवासी वाहतूक हे मुख्य उद्दिष्ट ठेवत सुरू झालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा सध्या वाढत्या तोट्यामुळे अडचणीत आहे. हे महामंडळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊननंतर अडचणीत सापडले आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी उत्पन्न वाढीची गरज आहे. त्यासाठी महामंडळांच्या वतीने उपक्रम राबविण्यात येत असून बंद झालेली कुरिअर सेवाही सुरू केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून यापूवीर्ही कुरिअर सेवा सुरू करण्यात आली होती, चंद्रपूर जिल्ह्यातही या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता, हे विशेष.एखाद्या बसस्थानकावर बुकिंग केल्यानंतर ग्राहकाला आवश्यक त्या ठिकाणच्या बसस्थानकावर पार्सल पोहोचता होत असत. त्यामुळे छोटया मोठया व्यावसायिकांची मोठी सोय झाली होती. कालांतराने ही पार्सल सेवा महामंडळाने खासगी कंपनीकडे दिली. मात्र, तरीही राज्य परिवहन महामंडळाला त्या सेवेमधून अपेक्षित यश न मिळाल्याने ती बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेक व्यावसायिकांची गैरसोय होत होती. त्यासाठी एसटीने पुन्हा ही सेवा सुरु करावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती. आता तोटयात असलेल्या महामंडळाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी परिवहन व्यवस्थापनाकडून नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. एसटी महामंडळाने यापूर्वी सुरू केलेली व नंतर बंद केलेली कुरिअर सेवा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. लवकरच याबाबतचे नियोजन करून ही सेवा जनतेला मिळणार आहे. कुरिअर सेवा सुरू केल्यास महामंडळाला उत्पन्न वाढीचे एक साधन उपलब्ध होणार आहे.जिवती तालुकावगळता विविध मार्गावर गाड्याा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाची भीती पूर्णत: लोकांच्या मनातून गेली नसल्याने प्रवाशांना हवा तसा प्रतिसाद अनेक मार्गावर गाड्यांना मिळत नाही. याउलट काही मार्गावर गाडयांची संख्या कमी असल्याने एका गाडीत २२ पेक्षा जास्त प्रवासी बसवावे लागत आहेत. त्यामुळेही वाहकांसमोर अडचणी आहेत.मालवाहतुकीला चांगला प्रतिसादमहामंडळाच्या मालवाहतुकीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भविष्यात प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूकही वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या २५ प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांचे मालवाहतुकीत रूपांतरण करण्यात आल्या आहेत. या गाड्या माल वाहतूक करीत आहेत. त्यातून जिल्ह्यात महामंडळाला महिन्याकाठी साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पुढे आणखी मालवाहतुकीच्या गाड्या वाढवून अधिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न चंद्रपूर महामंडळाचा असणार आहे. अन्य मालवाहतूक दरापेक्षा एसटी महामंडळाचे मालवाहतुकीचे दर कमी आहेत. त्याचा फायदा महामंडळाला होत आहे.कोरोनामुळे एसटी तोट्यातअलिकडे कोरोनाचा समूह संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे एसटीची सेवा बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती आणखीनच कोलमडली आहे. त्यासाठी लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर एसटीच्या माध्यमातून प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे. पुढील काळात शासकीय धान्य, रोपे अथवा शासकीय मालाची वाहतूकही एसटीच्या माध्यमातून करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.जिल्ह्यात सध्या २५ गाड्यांमधून मालवाहतूक सुरू आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिन्याकाठी साडेचार लाख रुपये उत्पन्न होत आहे. मालवाहतूक गाड्या आणखी वाढवू. आता कुरिअर सेवाही सुरू करण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे. यासंदर्भात आदेश येताच पुढील कार्यवाही सुरू होइल.- राजेंद्र पाटील,विभागीय नियंत्रक,चंद्रपूर परिवहन महामंडळ.
एसटी देणार पुन्हा कुरिअर सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 5:00 AM
एखाद्या बसस्थानकावर बुकिंग केल्यानंतर ग्राहकाला आवश्यक त्या ठिकाणच्या बसस्थानकावर पार्सल पोहोचता होत असत. त्यामुळे छोटया मोठया व्यावसायिकांची मोठी सोय झाली होती. कालांतराने ही पार्सल सेवा महामंडळाने खासगी कंपनीकडे दिली. मात्र, तरीही राज्य परिवहन महामंडळाला त्या सेवेमधून अपेक्षित यश न मिळाल्याने ती बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेक व्यावसायिकांची गैरसोय होत होती.
ठळक मुद्देउत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न : यापूर्वी जिल्ह्यात होता चांगला प्रतिसाद