लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील २३ गावात बस जात नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या गावात तातडीने बस सुरु करावी, अशी मागणी पारोमिता गोस्वामी यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. याची दखल घेत त्या २३ गावात त्वरीत बस सुरु करावी, बससासाठी रस्ते नसतील तर त्वरीत रस्त्यांचे बांधकाम करावे, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाºयांना दिले.जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सावली तालुक्यात वसतिगृहांचा प्रश्न मागील २०११ पासून शासन स्तरावर प्रलंबित आहे. वसतिगृहाअभावी मुले बाहेर तालुक्यात जात आहे. तर अनेकांनी शाळा सोडल्या आहेत. तर काही जीव धोक्यात घालून पायी सायकलने जात आहेत. सावली व पोंभुर्णा तालुक्यात आदिवासी मुले आणि मुली यांचे वसतिगृह बांधावे, नांदगांव येथील आदिवासी मजूर गुरूदास सोमा सिडाम यांचे हात खासगी डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे खराब झाले. यामुळे या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याने शासनाने या मजुरांला भरपायी द्यावी, सावली तालुक्यातील चेक मानकापूर येथील आदिवासी शेतमजूर ऋषी मारोती मडावी हा कीटकनाशकांच्या फवारणीत मृत पावला. कीटकनाशकांच्या फवारणीत मृत व्यक्तीला भरपायी देण्याची तरतूद असतानाही मागील चार महिन्यांपासून मदत देण्यात आली नाही. ती मदत तातडीने द्यावी, दारुबंदीची कठोर अमंलबजावणी करावी, अशी मागणी केली.यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सावली व पोंभुर्णा येथे वसतिगृहासाठी जानेवारीपर्यंत मंजूरी मिळवून घेणार, असे आश्वासन दिले. तसेच मृत शेतकºयांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार, घनश्याम मेश्राम आदी उपस्थित होते.
‘त्या’ २३ गावात त्वरित बस सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:12 PM
सिंदेवाही तालुक्यातील २३ गावात बस जात नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या गावात तातडीने बस सुरु करावी, अशी मागणी पारोमिता गोस्वामी यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पारोमिता गोस्वामी यांच्या मागणीनंतर लगेच अधिकाऱ्यांना निर्देश