---
आवारपूर - मुरली ॲग्रो मार्गाचे दुपदरीकरण करा
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील आवारपूर ते मुरली ॲग्रो पर्यंतच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. हा मार्ग दुपदरी झाल्यास गडचांदूरवरून वणीकडे जाणाऱ्या वाहनांना जास्तचे अंतर मोजावे लागणार नाही. त्यामुळे या रस्त्याची तातडीने निर्मिती करावी, अशी मागणी केली जात आहे.
-----
गांधिनगर - तेजापूर नदी घाटावर पुलाची मागणी
कोरपना : चंद्रपूर- यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील गांधीनगर घाटावर पूलांची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते पद्माकर मोहितकर व नागरिकांनी केली आहे.या नदी घाटावर पुलाची निर्मिती झाल्यास तेजापूर, आमलोन, गणेशपूर, नेरड , पुरड, कायर, घोंसा आदी गावाला जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होणार आहे. पर्यायाने या भागातील नागरिक कोरपना बाजारपेठेशी जोडले जाईल. तसेच जाण्या-येण्याची अडचण दूर होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांची निर्मिती करावी, अशी मागणी केली जात आहे. सद्यस्थितीत खातेरा पूलाची निर्मिती होत आहे. मात्र हाही मार्ग उलट फेऱ्यांचा व अधिक अंतराचा आहे. त्यामुळे या पूलाच्या निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.