फोटो
बल्लारपूर : गेले सुमारे दीड वर्षापासून काही प्रवासी रेल्वे गाड्या बंद आहेत. कोरोनाची लाट बरेच प्रमाणात ओसरली असून जनसामान्यांचे बरेचसे दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. अशा प्रसंगी बंद असलेल्या व सामान्याच्या प्रवासाला उपयोगी येणाऱ्या गाड्या परत सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी प्रांतीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य येथील अजय दुबे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांना नागपूरला भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जलद धावणाऱ्या रेल्वे प्रवासी सर्वच गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, बल्लारशा वर्धा, बल्लारशा मुंबई सेवाग्राम लिंक एक्स्प्रेस, ताडोबा एक्स्प्रेस, आनंदवन एक्स्प्रेस, काजीपेट पुणे एक्स्प्रेस, बल्लारशा गोंदिया पॅसेंजर व सर्वसामान्य प्रवाशांकरिता नित्याच्या प्रवासाला उपयोगी पडणाऱ्या गाड्या दीड वर्षापासून बंद आहेत. यामुळे गरीब व सर्वसामान्य लोकांना प्रवास करायला अडचण येत आहेत. त्यामुळे या बंद गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहेत. तद्वतच नागपूर विभागातील सर्वच रेल्वे कर्मचारी रेल्वे स्थानकावरचे दुकानदार यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस लवकर देण्यात यावी. बल्लारशा त्याचप्रमाणे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, बल्लारशा येथील रेल्वे पीट लाइनचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे. अशाही मागण्या चर्चेतून करण्यात आल्यात. खरे यांनी या समस्यावर लक्ष देऊन त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी रेल्वे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक के एस. पाटील हे उपस्थित होते.