संपूर्ण कर्जमाफी : काँग्रेसची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी चिमूर विधानसभा क्षेत्रात जि.प. चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांच्या नेतृत्वात संघर्ष यात्रा काढण्यात आली. जांभूळघाट येथून ही संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली.या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, स्वामिनाथन आयोग लागू करा आदी मागण्या करण्यात आल्या. संघर्ष यात्रेचे नागभीड तालुक्यात कानपा येथे आगमन होताच तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे यांनी स्वागत केले. या ठिकाणी पालेभाज्या रस्त्यावर टाकून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित आंदोलकांना कृषिभूषण मोरेश्वर झाडे यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर ही संघर्ष यात्रा मौशी, नान्होरी, नांदगाव, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, नागभीड याठिकाणी जनजागरण केले. यात्रेदरम्यान, प्रत्येक ठिकाणी पालेभाज्या रस्त्यावर टाकून शासनाचा निषेध करण्यात आला व संपुर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. या संघर्ष यात्रेत जि.प. सदस्या ममता डुकरे, पं.स. सदस्य रोषण ढोक, विजय गावंडे, नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, किसान सेलचे अध्यक्ष आनंद भरडकर, नगरसेवक दिनेश गावंडे, प्रतीक भसीन, रमेश ठाकरे, अमोल वानखेडे, प्रमोद जुगनाके यांचा सहभाग होता.
जांभूळघाट येथून संघर्षयात्रा प्रारंभ
By admin | Published: June 12, 2017 12:41 AM