लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चिचपल्ली येथे भाऊ (बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट) केंद्राच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोडरे, चिचपल्लीचे सरपंच श्रीकांत बावणे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी केले. जि.प. अध्यक्ष भोंगळे म्हणाले, बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिटच्या माध्यमातून बांबू वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्यास स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध होईल. या माध्यमातून सर्वांगीण विकास होण्यास मदत होऊन आत्मनिर्भर होतील. चांदा ते बांदा योजनेंतर्गत भाऊच्या माध्यमातून सुमारे २०० महिलांना बांबू वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्याद्वारे स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे. महिला विकास महामंडळामार्फत इच्छुक महिलांची निवड करून प्रशिक्षणासाठी तयार करणे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राकडून तज्ञ प्रशिक्षकांचे सहाय्याने ६० दिवसांत बांबू वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणा दरम्यान महिलांना मानधन किंवा टूल कीट पुरवठा करण्यात येतो. सदर प्रशिक्षणासाठी भाऊ केंद्राची स्थापना करण्यात येते. यामध्ये अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यात येऊन त्याद्वारे महिलांना बांबूच्या दजेर्दार वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.महिलांनी तयार केलेल्या बांबू वस्तूच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्या जाते. भविष्यात महिलांची सहकारी संस्था स्थापन करून त्याच्या रोजगारासाठी चालना देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि आर्थिक तरतूद करण्यात येते. जी. सी. मेश्राम यांनी आभार मानले.चिमूर काँग्रेसचे दोन माजी तालुकाध्यक्ष भाजपातचिमूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष तथा आजीवन गुरुदेव प्रचारक राजू देवतळे व युवक काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष राजू दांडेकर यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.चिमूर येथे आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात या पक्षप्रवेशाची औपचारिकता पार पडली. याप्रसंगी खासदार अशोक नेते व आमदार कीर्तीकुमार भांगडिया, वसंत वारजूकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शाम हटवादे, तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, जि.प.सदस्य रेखा कारेकर, नगरसेवक भारती गोडे, पं.स.सदस्य अजहर शेख, दिगांबर खलोरे, मजहर शेख, डॉ. दीपक यावले, विनोद अढाल, बकाराम मालोदे आदी उपस्थित होते.पेठगाव-राजोली-तांबेगडी मेंढा मार्गातील पूल वाहतुकीला खुलाराजोली : मुल तालुक्यातील राजोली येथे पेठगाव-राजोली-तांबेगडी मेंढा या मार्गावर १० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला पूल दळणवळणासाठी सुरू झाला आहे. तसेच राजोली येथे ७ कोटी ५० लाख रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात येणार असून या इमारत बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, जि. प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, माजी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, जि. प. सभापती संतोष तंगडपल्लीवार, पंचायत समिती सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदु मारगोनवार, जि.प.सदस्य नागराज गेडाम, पं.स. सदस्य घनश्याम जुमनाके, वर्षा लोनबले, जयश्री वलकेवार, मुलचे नगरसेवक चंद्रकांत आष्टनकर, डोंगरगाव सरपंच मुकेश गेडाम, माजी उपसभापती गजानन वलकेवार, सुरेश पाटील ठिकरे, विजय पाकमोडे यांच्यासह कार्यकारी अभियंता कोठारी, बुरांडे आदींची उपस्थिती होती.
बांबू वस्तू तयार करण्याच्या प्रशिक्षण केंद्र उभारणीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 10:42 PM
जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चिचपल्ली येथे भाऊ (बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट) केंद्राच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोडरे, चिचपल्लीचे सरपंच श्रीकांत बावणे आदींची उपस्थिती होती.
ठळक मुद्दे२०० महिलांना प्रशिक्षण मिळणार : स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार