चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती कृती समितीने केली मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी हालचाली सुरू आहे. परंतु दारूचे दुष्परिणाम लक्षात घेऊन जिल्हा दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी येथील सामाजिक संघटना व समित्या एकत्र येऊन चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती कृती समितीची स्थापना केली असून, समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना चार हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले. यात गुरुदेव सेवा मंडळ, पतंजली योग समिती, महिला संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ज्येष्ठ नागरिक संघ अशा विविध सामाजिक संघटना व समित्याच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, कृती समितीचे जिल्हाप्रमुख विजय चिताडे, जिल्हा सेवाधिकारी रूपलाल कावळे, विठ्ठल सावरकर, समितीचे सचिव दयाराम नन्नावरे, उपाध्यक्ष आण्याजी ढवस, ज्येष्ठ नागरिक संघाचे अशोक संगीडवार, ग्रामसेवाधिकारी धर्माजी खंगार, मुरलीधर गोहणे, शंकर दरेकर, देवराव कोंडेकर, सुरेश चौधरी , पुंडलिक खनके घुग्गुस, गजानन सातपुते सोनेगाव, पतंजली योग समिती रमेश ददगाळ, देवराव बोबडे, बबनराव अनमुलवार, भास्कर इसनकर, रामराव हरणे रंगराव पवार पिंपरी, आनंदराव मांदाळे, शारदा रोडे, सुमन चांदेकर, मायाताई बोबडे, प्रा. प्रज्ञा गंधेवार, मायाताई मांदाळे, सुनिता गुज्जनवार, वेणूताई टोंगे, सविता शेंडे उपस्थित होते.
लक्ष्मणराव गमे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विजय चिताडे यांनी आभार मानले.
बाॅक्स
ही आहे मागणी
जिल्ह्यात दारूबंदी उठवू नये, दारूमुक्त समाज निर्माण व्हावा असे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचा विवेकी विचारातून विचार करावा, दारू विक्रीतून उद्भवणारा दुष्परिणामांचा सखोलपणे विचार व्हावा, दारूची अंमलबजावणी अधिक कडक करावी, सर्वत्र पोलीस दलाची निर्मिती करावी. गाव पातळीवर समितीचे गठन करावे, असे निवेदन देण्यात आले आहे.