लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : ‘व्हेलेंटाईन डे’ म्हणजे युवक-युवतींना प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस मानण्याचे खुळ ग्रामीण भागातही निर्माण झाले. नात्याहून मैत्रीचे नाते श्रेष्ठ असते, हे खरेच आहे. आजची पिढी चंगळवादी विचारांच्या आहारी जाऊन चुकीचे पायंडे पाडत आहे. यामुळे अशा विचारांपासून दूर राहण्यासाठी समाजप्रेमी व सामाजिक भान असणाऱ्या तरूणाईने अन्य युवक-युवतींना सावध करण्याचा संकल्प केला पाहिजे.मैत्रीच्या नात्यात व्यवहार, उपकार व आभार नसतो. केवळ एका मनाचे दुसºया मनाशी निखळ आपुलकीने नाती समृद्ध करायचे असते. या दिवसाची अनेकजन आतूरतेने वाट पाहत असतात. आवडीच्या व्यक्तीच्या सहवासात काही क्षण घालविण्यासाठी हे प्रेमवेडे निवांत ठिकाणी फिरायला जातात. बगिचा, वनराई, माळरान, निवांत किल्ले, मंदिर, नदी, नाले, तलाव, धरणे, डोंगर, धबधबे अशा ठिकाणांना पसंती असते. मैत्री, प्रेम या भावनांना मानवी जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. मैत्री व प्रेम या दोनही बाबी पूर्णपणे भिन्न असल्या तरी त्यात जवळीकता आहे. मैत्री, प्रेमाला रंग नसतो. जात, धर्म, पंथ या बंधनात अडकून ठेवता येत नाही. निरागसपणे मनाला आल्हाद देणारे हे नाते अलगदपणे निर्माण होते. मैत्री, प्रेम यातून निर्माण झालेल्या नात्यात एकनिष्ठ राहून पुढे वाटचाल केली पाहिजे. मैत्री व प्रेमाला व्यक्त करण्यासाठी तरूण पिढी आता वाईट गोष्टींच्या नादी लागली. या दिवशी प्रेक्षणीय स्थळांच्या परिसरात नजर टाकल्यास मान खाली जाते. सोशल मिडियामुळे संवादाची प्रक्रिया गतिमान झाली. तरूणाईवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. यातूनच चुकीच्या मार्गाने जाणाºया युवक-युवतींची संख्या वाढू लागली आहे. या समस्येवर पालक आणि पाल्यांचा सुसंवाद हाच एकमेव पर्याय आहे. किमान जागरूक युवक-युवतींनी याचे भान ठेवून हा दिवस साजरा केला पाहिजे.
चंगळवादी, उथळ विचारांपासून दूर राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:26 PM
‘व्हेलेंटाईन डे’ म्हणजे युवक-युवतींना प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस मानण्याचे खुळ ग्रामीण भागातही निर्माण झाले. नात्याहून मैत्रीचे नाते श्रेष्ठ असते, हे खरेच आहे. आजची पिढी चंगळवादी विचारांच्या आहारी जाऊन चुकीचे पायंडे पाडत आहे.
ठळक मुद्देव्हेलेंटाईन डे : मैत्रीचे निकोप मूल्य आचरणात आणण्याची गरज