बॉक्स
वातावरणात बदलले; काळजी घ्या
वातावरणात बदल झाल्यामुळे पाणी स्वच्छ करुन उकळून प्यावे. आहारामध्ये विशेष लक्ष द्यावे. थंड पदार्थ, फ्रिजमधील पाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खाणे टाळावे. जेथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते, अशा ठिकाणी जाणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला सर्दी किंवा खोकला असेल तर त्याचा संसर्ग लहान मुलांना लगेच होऊन ते आजारी पडू शकतात.
बॉक्स
जिल्ह्यात झाले ६५ टक्के पाणी
यंदा मोठ्या प्रमाणात पाणी येण्याचे भाकीत हवामान विभागाने वर्तविले होते. मात्र ऑगस्ट महिना संपत असताना जिल्ह्यात आतापर्यंत ६५.६ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील बहुतांश जलाशये शंभर टक्के पूर्ण भरली आहेत. जिल्ह्यात ११९.८ मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा केवळ ७८६.२ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.