लोकमत व गायडन्स पॉर्इंटचा उपक्रम : विद्यार्थ्यांसाठी पार पडला सेमिनार व शिष्यवृत्ती परीक्षा चंद्रपूर : आयुष्याचा प्रवास यशासाठी असतो. त्यासाठी परीक्षा द्याव्याच लागतात. मात्र या परीक्षांतील यशासाठी तणावमुक्त राहा, असा मोलाचा सल्ला डॉ. रविंद्र क्षिरसागर यांनी दिला.लोकमत व गायडन्स पार्इंटद्वारे स्थानिक लक्ष्मीनारायण मंदिर सभागृहात सेमिनार व शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन १५ एप्रिलला पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. रविंद्र क्षिरसागर यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी लोकमत परिवारातील जेष्ठ सदस्य अशोक बोथरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून गाईडन्स पॉर्इंटचे संचालक संजय कर्माकर, आपरेशन इंचार्ज रितेश लोहकरे, कार्यकारी संचालक सिद्धार्थ वाहने, इन्फोसीसचे व्यवस्थापक मनिष नेमा, लोकमत जिल्हा कार्यालयाचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, लोकमत जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर उपस्थित होते. डॉ. रवींद्र क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सेमिनारमध्ये देशातील प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती दिली. त्याच बरोबर जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स व ‘नीट’ परीक्षेचे बदलते स्वरूप यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच जेईई मेन, अॅडव्हान्स व नीटची तयारी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावी, त्यात पालकांनी आपल्या पाल्याला कशाप्रकारे मार्गदर्शन करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली.दरम्यान, उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉ. रवींद्र क्षीरसागर यांना विविध प्रश्न विचारून शंकांचे निराकरण केले. गाईडन्स पॉर्इंटचे संचालक संजय कर्माकर, आॅपरेशन इंचार्ज रितेश लोहकरे, इन्फोसीसचे व्यवस्थापक मनिष नेमा यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाखण्याजोगे होता. सेमिनारमध्ये ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सेमिनारनंतर लगेचच शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना गाईडन्स पॉर्इंटतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा इव्हेंट प्रमुख अमोल कडूकर यांनी तर आभार लोकमत सखी मंच सयोजिका पूजा ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झिनत पठाण, प्रियंका वरघने, सोनाली मडावी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
परीक्षेतील यशासाठी तणावमुक्त राहा - रवींद्र क्षीरसागर
By admin | Published: April 16, 2017 12:26 AM