सचिन सरपटवार।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : ‘आदल्या दिवशी फक्त चणे खाल्ले, रात्री तर जेवलोच नाही, दुसऱ्या दिवशी मात्र जेवणाचा डब्बा आला’ ही प्रातिनिधीक व्यथा आहे विजासन ते देऊळवाडा टेकडीवर राहणाऱ्या एका कुटुंबातील. कोरोनाच्या प्रभावामुळे असे अनेक गरीब कुटुंब सकाळ व संध्याकाळचे झाले, उद्याच्या भोजनाचे काय, या विवंचनेत आहेत. परंतु प्रशासनाची वाट न बघता अशा गरजु व्यक्तींना मदत करण्यासाठी शहरातील अनेक हात सरसावले आहेत.फुकटनगर मधील एका दिव्यांग महिलेकडे जेव्हा जीवनावश्यक वस्तुंची किट पोहचविण्यात आली, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते, ‘तुम्ही देवासारखे आले’ अशी तिची प्रतिक्रिया होती. मदत घेणारा अडचणीत आहे, कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीतीशी तो लढत आहे, अशावेळी तो एकटा नाही तर आपण सगळे त्याच्यासोबत आहोत, या भावनेतून अनेक स्वयंसेवी संस्था तसेच व्यक्तींकडून गरजूंना जीवनाश्यक साहित्य वाटपाचे काम अव्याहतपणे सुरू आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला काही देणे लागतो, ही भावना रूजल्याने गरजवंतांकडे सहजपणे मदत पोहोचत आहे.दररोज ३५० भोजनाचे डब्बेएकही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर व नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यामार्फत शहरातील वृद्ध व गरजुंना दररोज दोन्ही वेळचे ३५० जेवणाचे डब्बे प्रभागनिहाय वाटप केले जात आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात खासदार धानोरकर यांच्याकडून दररोज पाच हजार जेवणाचे डब्बे वाटप पोहचवणे सुरू आहे. नगरसेवक तथा कार्यकर्तेही प्रभागनिहाय जबाबदारी स्वीकारून मदत कार्य करीत आहे. नगर परिषदेतर्फे केलेल्या सर्वेक्षणानुसार काही व्यक्तींकडे रेशनकार्ड नसल्याचे आढळले. अशा व्यक्तींना धान्य देण्यात येणार आहे.मदत करणाऱ्या संस्थायुथ फाऊंडेशन, योगा डॉन्स ग्रुप, विंजासन बुद्ध लेणी, साधू बहुउद्देशीय संस्था, गुरुदेव सेवा मंडळ, जैन मंदिर, भद्रनाग मंदिर देवस्थान, संत निरंकारी मंडळ, उन्नती एएलएफ, नगर परिषद, लोकसेवा मंडळ, लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, लोकमान्य ज्ञानपीठ, बचतगट महिला, नगर परिषद कर्मचारी, सुतार समाज, अंबिका लॉन, लक्ष्मी किराणा स्टोअर्स, ब्लड कॅम्प ग्रुप, बळवंतराव गुंडावार, अॅक्स मशिद, हनुमान मंदिर, बीपीएल ग्रप संताजी नगर.
पाऊले चालली गरजवंतांच्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 5:00 AM
फुकटनगर मधील एका दिव्यांग महिलेकडे जेव्हा जीवनावश्यक वस्तुंची किट पोहचविण्यात आली, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते, ‘तुम्ही देवासारखे आले’ अशी तिची प्रतिक्रिया होती. मदत घेणारा अडचणीत आहे, कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीतीशी तो लढत आहे, अशावेळी तो एकटा नाही तर आपण सगळे त्याच्यासोबत आहोत, या भावनेतून अनेक स्वयंसेवी संस्था तसेच व्यक्तींकडून गरजूंना जीवनाश्यक साहित्य वाटपाचे काम अव्याहतपणे सुरू आहे.
ठळक मुद्देसेवाभावी संस्था सरसावल्या : जीवनाश्यक साहित्य वितरण सुरूच