शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 12:45 AM

येथील पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराविषयी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनचे वृत्त प्रकाशित होताच प्रचंड खळबळ माजली.

संवर्ग अधिकाऱ्यांनी घेतली बैठक : योग्य वागा अन्यथा परिणाम भोगाभद्रावती : येथील पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराविषयी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनचे वृत्त प्रकाशित होताच प्रचंड खळबळ माजली. यासंदर्भात संवर्ग विकास अधिकारी यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून खरपूस समाचार घेतला. येणाऱ्या सोमवारपासूृन मला सर्व सुधारणा दिसल्या पाहिजे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागेल, असा दम दिला.१४ आॅक्टोबरला ‘लोकमत’ने पंचायत समितीच्या सर्व विभागांसह परिसरावर पाळत ठेवून स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यात या पंचायत समितीच्या सभापती निवासातील कृषी कार्यालयातील टाकीत रिकाम्या दारुच्या बाटलांसह इतर साहित्य आढळले. तसेच परिसरातसुद्धा दारुच्या रिकाम्या बाटलांचा सडा पडलेला दिसला. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी खर्रा आणि पानाच्या पिचकाऱ्या आढळल्या. संपूर्ण परिसरात वाढलेला कचरा असल्याने स्वच्छतेचे धिंडवडे उडाले होते. कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयीन वेळेत शेजारी असलेल्या पानठेल्यावर असल्याचे आढळले. या सर्व बाबींबाबत संवर्ग विकास अधिकारी तुपे यांना विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही.या संदर्भातील वृत्त १५ आॅक्टोबरला ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच चांगलीच खळबळ माजली. सकाळीच संबधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयाखत येऊन दारुच्या रिकाम्या बॉटला आणि इतर ठिकाणच्या घाणीची साफसफाई करून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. दुपारी संवर्ग विकास अधिकारी तुपे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन सर्वांनाच त्यांनी धारेवर धरले. हा प्रकार यापुढे खपवून घेणार नाही. जर आपण असेच वागलात तर गंभीर परिणाम भोगण्यास तयार रहा, असा दम दिला. सभापती निवासात असलेला कृषी विभाग सोमवारलाच अन्यत्र हलविण्याचे निर्देशसुद्धा दिले. बातमीनंतर सर्वच कर्मचारी आपआपली कामे करताना दिसून आले. (शहर प्रतिनिधी)