टॅक्स
ऑटोचालक : ऑटो खरेदी करताना सरकारकडून रोड टॅक्स आकारला जातो. यामुळे ऑटोसह अधिकचे पैसे मोजावे लागले.
कामगार : दररोज काम मिळण्याची शाश्वतीच नाही. मिळाली तरी बोटावर मोजण्याइतके उत्पन्न मग टॅक्स कशाला भरणार
भाजीपाला विक्रेता : स्थानिक स्वराज्य संस्था दररोज चिठ्ठीच्या स्वरुपात भाजीपाला विक्रेत्यांकडून कर गोळा करतात.
सिक्युरिटी गार्ड : महिन्याला महिना वेतन मिळत नाही. वेतनातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. मग टॅक्स कशाचा भरणार.
सलून चालक : व्यवसायातून घरखर्च, घर आणि दुकान भाडेदेखील निघत नाही. मग टॅक्स कसा भरायचा?
घरकाम करणाऱ्या महिला : उत्पन्न कमी असल्याने आजपर्यंत कोणताही टॅक्स भरला नाही. शासन कोरोनात कोणत्याही योजना देत नाही.
सफाई कामगार : तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकिरीचे आहे. कोरोनाने मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे टॅक्स कुठून आणि कशाला भरणार.
लॉन्ड्रीचालक : अडीच लाखांच्यावर वार्षिक उत्पन्न असले तर टॅक्स भरावे लागते. आमचे वार्षिक उत्पन्न लाखांच्या वर जात नाही. त्यात कुटुंबांचा उदरनिर्वाहच होणे कठीण आहे. मग आम्ही टॅक्स कशाला भरणार.
-----
प्रत्येकजण भरतो टॅक्स
देशातील प्रत्येक नागरिक प्रत्यक्ष-अप्रत्यरित्या टॅक्स भरत असतो. पाच लाखांच्या वर उत्पन्न असेल तर इन्कम टॅक्स भरावा लागतो. याव्यतिरिक्त पेट्रोल, डिझेल, औषध यासह विविध सेवा घेण्याच्या माध्यमातून आपण टॅक्स भरत असतो. हा टॅक्स अप्रत्यक्षरित्या भरत असल्याने अनेकांना माहिती नाही. त्यामुळे त्यांना टॅक्स भरत नसल्याचे वाटते.
सी.ए. रिया उत्तरवार, चंद्रपूर