लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सोयीसुविधा मिळाव्यात आणि आरक्षणाच्या प्रवर्गात सामील करावे, या मागणीसाठी सोमवारी संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.महाराष्टातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामील करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र त्यांनी दिशाभूल केली. हा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीत जगत असताना शासन दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारने शिफारस केली नाही. परिणामी धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहिला. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. तुषार मर्लावार, साईनाथ बुच्चे, योगीराज उगे, डॉ. यशवंत कन्नमवार, पं. स. सदस्य विजय कोरेवार, रामकृष्ण आकेपल्ली, पवन ढवळे, सुनिल पोराटे जिवती व कोरपना तालुक्यातील शेकडो धनगर बांधव सहभागी झाले होते.
आरक्षणासाठी धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:19 PM
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सोयीसुविधा मिळाव्यात आणि आरक्षणाच्या प्रवर्गात सामील करावे, या मागणीसाठी सोमवारी संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देसमस्यांकडे वेधले लक्ष : तालुक्यातील शेकडो धनगर बांधवांचा सहभाग