आॅनलाईन लोकमतघुग्घुस : वेकोलिच्या वणी क्षेत्रातील मुंगोली, पैनगंगा खुल्या कोळसा खाण ते घुग्घुस रेल्वे सायडींगपर्यत रात्रंदिवस नकोडा गावाला लागून कोळशाची वाहतूक होते. यामुळे प्रदूषण होत असून गावकरी त्रस्त झाले आहेत. ही वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी शनिवारी गावकºयांनी रास्तारोको आंदोलन केले.या रास्तारोकोमुळे कोळशाच्या वाहनांची रांग लागली होती. दरम्यान, गावातील नागरिकांचा संताप अधिक वाढत असल्याचे पाहून वेकोलिच्या अधिकाºयांनी बायपास मार्गाने वाहतूक वळविली. शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सदर रस्त्यावर नकोडा येथील नागरिकांनी दगड ठेवून वाहतुकीचा रस्ता बंद केला. लोक वसाहतीला लागून असलेल्या रस्त्यावरून कोळसा वाहतूक होत असल्याने गावात दिवसभर धुळीचे साम्राज्य राहते. रस्त्यावर अपघात झाले आहेत. मागील दोन वर्षांपासून सदर कोळसा वाहतुकीसाठी बायपास मार्ग काढण्याची मागणी ग्रामपंचायतीने वेकोलिकडे केली होती. बायपास मंजूर करण्यात आला. मात्र बायपासचे काम कासवगतीने सुरू आहे. संतप्त झालेल्या गावातील महिला-पुरुषांनी रस्त्यावर दगड ठेवून रस्ताच रोखून धरला. अजूनही रस्त्यावर दगड टाकलेले आहे. याप्रसंगी सरपंच तनुश्री बांदूरकर, किरण बांदूरकर, संजय चटप, नंदा मेश्राम, यासीन परवीन, माला मुरके, आशा चतुरकर, ललिता मारबते, विनोद चतुरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
नकोडा येथे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:25 PM
वेकोलिच्या वणी क्षेत्रातील मुंगोली, पैनगंगा खुल्या कोळसा खाण ते घुग्घुस रेल्वे सायडींगपर्यत रात्रंदिवस नकोडा गावाला लागून कोळशाची वाहतूक होते.
ठळक मुद्देकोळसा वाहतुकीमुळे प्रदूषण : वेकोलिने तात्पुरता मार्ग बदलविला