शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ऐतिहासिक जुनोना तलावाची उपेक्षा थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 1:07 AM

जुनोना तलावाची डागडुजी ब्रिटीश कालावधीत झाली. मात्र, चंद्रपूरच्या गोंड राजानी हा तलाव बांधला आहे. आजही तलाव परिसर व तलावाच्या पाळीवर चंद्रपूरच्या पुरातन गोंड राजांच्या काळातील काही वस्तुचे अवशेष दिसून येतात. या तलावाच्या पाळीची लांबी १५०० मिटर आहे. साडेनऊ मिटरवर राननाला आणि खरकडोह नाल्याचे पाणी साडेपाच किलोमिटर वरून जुनोना तलावात येते.

ठळक मुद्देइतिहास गडप होण्याच्या मार्गावर : पुरातत्त्व अभ्यासक आचार्य टी. टी. जुलमे यांनी वेधले शासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या गोंडकालीन जुनोना तलावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी पुरक असताना आजही उपेक्षा सुरू आहे. राज्य शासनाने आता तरी या स्थळाकडे गांभीर्याने लक्ष देऊन विकास करण्याची मागणी पुरातत्त्व अभ्यासक आचार्य टी. टी. जुलमे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.जुनोना तलावाची डागडुजी ब्रिटीश कालावधीत झाली. मात्र, चंद्रपूरच्या गोंड राजानी हा तलाव बांधला आहे. आजही तलाव परिसर व तलावाच्या पाळीवर चंद्रपूरच्या पुरातन गोंड राजांच्या काळातील काही वस्तुचे अवशेष दिसून येतात. या तलावाच्या पाळीची लांबी १५०० मिटर आहे. साडेनऊ मिटरवर राननाला आणि खरकडोह नाल्याचे पाणी साडेपाच किलोमिटर वरून जुनोना तलावात येते. १५० हेक्टर पेक्षा अधिक सिंचनाची क्षमता असून ९६ हेक्टर बुडीत परिसर मोडतो. तलावाचा परिसर हिरव्या वनश्रीने तसेच गावालगतच्या शेतीने नटला आहे. त्यामुळे पर्यटनपे्रमी नागरिक विद्यार्थी व हौशी अभ्यासक सहलीच्या निमित्ताने या तलावावर येतात. ही बाब लक्षात घेवून या रमणीय स्थळाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे, जलक्रीडा व इतर सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी असे क्षेत्र भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार प्रशासनाने प्रकल्पस्थळी नौकाविहार, बोटींग प्लॅटफॉर्म, लॅडस्केपिंग फवारे, पार्कीग बालोद्यान, रेस्टारंट, गेस्टहाऊस प्रसाधनगृह, खुले उपहारगृह आदी बाबी प्रस्तावित करून त्यासाठी निविदा मागविल्या, पण प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही, अशी माहिती आचार्य जुलमे यांनी पत्रात नमुद केली.४ जुलै १९९९ रोजी तलाव, गोंडकालीन महालाच्या १४-१५ व्या शतकातील प्राचीन विटा व इतर अवशेषांचे निरीक्षण छायाचित्रांसह संपूर्ण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. तलावाच्या पूर्वेला लोहाराच्या भट्टीतील लोखंडी मळ व मातीच्या भांड्यांचे तुकडे आढळले. या ऐतिहासिक माहितीची उपयोगिता अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने २९ नोव्हेंबर २००१ रोजी जुनोना येथे मुलांच्या खेळणी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पण, त्यानंतर हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.गोंडराजांची दूरदृष्टीकृषी समृद्धी व जलविहार याचा विचार करूनच गोंड राजांनी जुनोना तलावा निर्माण केला होता. ही दुरदृष्टी आजही उपयुक्त आहे. त्यामुळे राज्य सरकारने तलावाचे संवर्धन करण्यासाठी आराखडा तयार करण्याची मागणी आचार्य जुलमे यांनी अधिकाºयांकडे केली.