केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करीत तहसीलदार विजय पवार यांच्या मार्फत राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले. नव्याने पारित करण्यात आलेले शेतकरी विरोधी असलेले तीन कृषी कायदे, वीज बिल विधेयक २०२० तसेच कामगार विरोधी संहिता रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वासू सौंदरकर, युवा नेते जगदीश पिलारे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रेमलाल मेश्राम, आयटक संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद राऊत, किसान सभेचे तालुकाध्यक्ष सुधीर खेवले, अश्विन उपासे, लिलाधर वंजारी, राहुल भोयर, विनायक पारधी, महादेव बगमारे, विवेक नरुले, सुहास हजारे, पराग बनपूरकर, सागर हर्षे, गिरीधर गुरपुडे, दामोधर डांगे, दुधराम आकरे व विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ब्रह्मपुरीत रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:26 AM