शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

जलद बस थांब्यासाठी रस्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:14 PM

तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. विसापूर फाट्यापासून गावाचे अंतर दोन किमीचे आहे. या फाट्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी जलद व अती जलद बसेससाठी थांबा मंजूर केला. मात्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो.

ठळक मुद्देचालकांची मनमानी : विसापूर फाट्यावर रोखली बस

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. विसापूर फाट्यापासून गावाचे अंतर दोन किमीचे आहे. या फाट्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी जलद व अती जलद बसेससाठी थांबा मंजूर केला. मात्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष वेधण्यासाठी विसापूर फाट्यावर सोमवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडोवर नागरिकांनी सहभाग घेतला.चंद्रपूर-बल्लारपूर राज्य महामार्गावरुन विसापूर फाटा ओलांडून राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा, ब्रह्मपुरी, अहेरी व गडचिरोली आगाराच्या शेकडोवर बसेसचे आवागमन दररोज होत आहे. सर्वसाधारण, जलद व अति जलद बस थांबा २८ नोव्हेंबर २००८ रोजी विसापूर फाटा येथे मंजूर करण्यात आला. परंतु, संबंधीत आगारातील चालक जाणीवपूर्वक जलद व अती जलद बस थांबवित नाही. परिणामी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सोमवारी शेकडोवर नागरिकांनी रस्ता अडवून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस रोकल्या.चंद्रपूर जिल्ह्याचे ठिकाण असून दररोज शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, रोजगारासाठी ये-जा करणारे प्रवाशी, नोकरदार वर्ग, व्यापारी व सामान्य जनतेला जलद व अति जलद बस विसापूर फाट्यावर थांबवित नसल्याने अडचण सहन करावी लागते. परिणामी गावकºयांचा असंतोष वाढला. यावर कायमचा तोडगा निघावा म्हणून विसापूर येथील शिवाजी चौकातील मंचावर सभा घेण्यात आली.महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप खैरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत आयोजक नरेंद्र इटनकर, माजी सरपंच बंडू गिरडकर, शालीकराव भोजेकर, बबन परसूटकर, शशीकांत पावडे, रमेश लिंगमपल्लीवार, नत्थू ठाकरे, अनेकश्वर मेश्राम, महेंद्र सोरते, सुभाष हरणे, वामन गौरकार, योगेश्वर टोंगे, प्रदीप लांडगे, क्रांतीकुमार भोजेकर, अरुण बहादे आदी समर्थन मिळवून आंदोलन व्यापक करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.निवेदनाकडे केले जात होते दुर्लक्षविसापूर फाटा येथे जलद व अति जलद बसला थांबा मिळाला. मात्र चालकांकडून अंमलबजावणी केली जात नाही. यामुळे गावकºयात असंतोष बळावला. येथील कार्यकर्ता नरेंद्र इटनकर यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना निवेदन सादर करून समस्या सोडविण्याची विनंती केली. त्यांनी पाठपुरावा करूनही राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी लक्ष देत नव्हते. परिणामी गावकºयांचा संयम सुटला. नेहमीसाठी जलद व अतीजलद बसेस थांबाव्या म्हणून गावकºयांनी सोमवारी आंदोलनाचे हत्यार पुढे करून अधिकाºयांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.