शहरामध्ये राजुरा-आसिफाबाद-हैदराबाद हा राज्य महामार्ग आहे. यामार्गावर मालवाहतूक करण्यासाठी रेल्वेगाड्यांचा रूळ आहे. त्या या रेल्वे रुळावरून माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक व दालमिया सिमेंट तसेच सास्ती रेल्वे साईडिंग, पांढरपौनी रेल्वे साइडिंग येथील सिमेंट व कोळसा वाहतूक होत असते. या वाहतुकीमुळे दिवसभरात १० ते १५ वेळा प्रत्येकी १५ ते २० मिनिटांकरिता रेल्वे गेट बंद असते. या रेल्वे रुळाच्या पलीकडे श्री शिवाजी महाविद्यालय, आयटीआय कॉलेज, टेक्निकल कॉलेज, बस आगार, राजुरा शहरातील प्रमुख बाग, आदर्श विद्यालय, एमएसईबी पॉवर हाउस, आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह, व्यापारी भवन, सुतार समाजाचे समाजभवन आहे. यामुळे या परिसरात दिवसरात्र रहदारी सुरू असते. मात्र रेल्वे गेट वारंवार बंद राहात असल्यामुळे याचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
..अशी आहे पर्यायी व्यवस्था
या मार्गाच्या उजव्या बाजूला रेडिमेड बोगदा आहे. आपल्याकडून या कामाची अपेक्षा आहे. आपण काम करून देतो म्हणून घोषणासुद्धा केली होती. म्हणून या बोगद्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी ही विनंती नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी खासदार बाळू धानोरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.