वादळाचा तडाखा : पिपरबोडी येथील सात कुटुंबे उघड्यावर भद्रावती: शहरातील पिपरबोडी परिसरात शुक्रवारी आलेल्या वादळाने तेथील सात घरांवरील छपरे उडून गेलीत. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त घरांचे तहसील अधिकाऱ्यांकडून सर्व्हेक्षण करण्यात आले आले. वादळग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य शंकरय्या कालनेडी यांनी केली.शुक्रवारी २० मे रोजी झालेल्या वादळात पिपरबोडी येथील नागय्या कालनेडी, यलराम मलाईकोरवन, रामचंद्र म्हैसा, मुदू स्वामी कोरवन, व्यकटरमन कोरवन, कोचय्या मोलगुळ, विजय्या गडप्पी या सातजणांच्या घरावरील छपरे तर काहींच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे ेनुकसान झाले आहे. पिपरबोडी हे गाव आयुधनिर्माणी जंगलाच्या मध्यभागी असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर आहे. येथील नुकसानग्रस्त घराच्या दुरूस्तीसाठी घटनास्थळी तरहसील अधिकाऱ्यांनी भेट दिली असून येथील नुकसानग्रस्ताने त्वरीत मदत देण्याची मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य शंकरय्या कालनेडी यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
वादळाने अनेक घरांवरील छत उडाले
By admin | Published: May 22, 2016 12:33 AM