आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात ११ जानेवारीपासून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने चार दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता रविवारी शहर स्वच्छता अभियान, करियर मार्गदर्शन शिबिर, आरोग्य शिबिर, महानाट्य, संगीत कार्यक्रम, नृत्य स्पर्धा, मिस व मिसेस ब्रह्मपुरी अशा विविध कार्यक्रमांने झाली.उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार तर सिनेअभिनेता असराणी, सयाजी शिंदे, अभिनेत्री मुग्धा गोडसे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जि.प.सदस्य डॉ. सतीश वारजुकर, फादर मॅथ्यू निरप्पेल, प्रा. राम राऊत आदी उपस्थित होते.सायंकाळी एकल नृत्य, समुह नृत्य, गीत गायन स्पर्धा त्यानंतर सिंधूताई सपकाळ यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ११ जानेवारीली रात्री ‘शिर्डी के साईबाबा’ व दुसºया दिवशी ‘सम्राट अशोका’ हे महानाट्य पार पडले. हा महोत्सव डोळ्यात साठविण्यासाठी परिसरातील नागरिकांची लक्षणीय गर्दी होती. या महोत्सवात ब्रह्मपुरीकरांचे पाय आपोआपच थिरकत होती.महोत्सवासाठी किरण वडेट्टीवार, शितल वडेट्टीवार, अॅड. राम मेश्राम, प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, खेमराज तिडके, बाळू राऊत, डॉ. राजेश कांबळे, थानेश्वर कायरकर, वखार खान, नेताजी मेश्राम, अजहर शेख, यशवंत दिघोरे, मंगला लोनबले, स्मिग्धा कांबळे,डॉ.अमिर धम्मानी, डॉ. मोहन वाडेकर, मुन्ना रामटेके, मोहन बागडे, संजय ठाकूर व अन्य मंडळी तळ ठोकून होती.युवकांसाठी मार्गदर्शन शिबिर व मॅराथॉन स्पर्धामहोत्सवामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात युवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये प्रशांत वावगे, प्रशांत परदेसी, कुलराजसिंग, प्रा. देवेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील अनेक युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मराठी अभिनेत्री राधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत मॅराथान स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धेमध्ये बालकांपासून, वयोवृद्धापर्यंत तर अनेक युवती सहभागी झाल्या होत्या. यावेळी कुलकर्णी यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देऊन उत्साह वाढविला. तर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला होता.
ब्रह्मपुरी महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:23 PM
स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात ११ जानेवारीपासून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने चार दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देचार दिवस भरगच्च कार्यक्रम : ब्रह्मपुरीकरांनी अनुभवला एक आगळावेगळा क्षण