विसापूर : विसापूर रेल्वे हॉल्ट स्टेशनवर पथदिवे बंद असल्याने परिसरात काळोखाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षमुळे ही परस्थिती निर्माण झाली आहे, असे नागरिकांचे मत आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर सर्वांत मोठे गाव आहे. बल्लारपूर व चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या विसापूर गावात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद झाल्या. तेव्हापासून रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करणे सुरू केले आहे. विसापूर रेल्वे हॉल्ट स्टेशनवर प्रवाशांना सुविधा म्हणून १२ च्या आसपास वीज खांब आहेत. त्यावर दिव्याची व्यवस्था पूर्वी करण्यात आली होती. मात्र, मागील दोन वर्षांपासून रेल्वेस्थानक अंधारात आहे. विसापूर गाव रेल्वे लाइनमुळे दोन भागांत विभागले आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग आहे; परंतु गाव मोठे असल्यामुळे रेल्वेस्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणात अवागमन आहे. रेल्वेस्थानक अंधारात असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
080921\img-20210907-wa0043.jpg
विसापूर रेल्वे हॉल्ट स्टेशनवर पथ दिवे बंद असल्याने काळोख्याचे साम्राज्य