लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : छात्रशक्ती ही महाशक्ती असून बलाढ्य राष्ट्रनिर्मीतीची संकल्पना विद्यार्थ्यांच्या एकीकरणातूनच घडेल, यात दुमत नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रत्येक सदस्य देशसेवेच्या संस्काराचे बीज आत्मसात करून कार्य करित असतो. याचा सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन प्रो-कबड्डी खेळातील बंगाल वारियर्स संघाचा कर्णधार निलेश शिंदे यांनी केले.चंद्रपुरातील कन्यका परमेश्वरी सभागृह येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, चंद्रपूरतर्फे छात्र नेता संमेलन नुकतेच पार पडले. या संमेलनात ते बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अभाविपचे प्रांत संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, रवी दांडगे, आकाश मुंडे, रघुविर अहीर, योगेश येनारकर, स्नेहीत लांजेवार यांची उपस्थिती होती.निलेश शिंदे पुढे म्हणाले, आज विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांचे निवारण अभाविपतर्फे होत असून विद्यार्थ्यांची शैक्षणीक वाटचाल सुकर करण्याचे श्रेष्ठ कार्य अभाविपचा प्रत्येक सदस्य पार पाडत आहे. ज्ञान, शील व एकता या त्रिसूत्रीवर अभाविपचे संपूर्ण कार्य होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभाविपचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री रघुवीर अहीर यांनी चंद्रपूर महानगरातील विविध महाविद्यालयातील अभाविप कार्यकारिणी घोषित केली. यात नगर अध्यक्ष म्हणून योगेश येनारकर, नगरमंत्री स्नेहीत लांजेवार, सहमंत्री गौरव होकम, सहमंत्री यश बांगडे, महाविद्यालय प्रमुख आकाश लुक्कावार, विद्यार्थिनी प्रमुख एकता खेडकर, विद्यार्थिनी सहप्रमुख स्नेहल देशमुख, एसएफडी व एसएफएस प्रमुख मनिष पिपरे, कार्यालय प्रमुख क्रिष्णा पिपरे, क्रीडा प्रमुख प्रतिक काकडे, जनजाती प्रमुख अंकीत कोडवते, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख साकेत सोनकुसरे, टीएसव्हीपी प्रमुख शुभम मुद्दावार, सोशल मीडिया व प्रसिद्धी प्रमुख प्रमुख प्रवीण गिलबीले, नगर कार्यकारिणी सदस्य सुरज रागिट यांचा समावेश आहे.यावेळी निलेश शिंदे यांच्या हस्ते ‘मिथून’ या मराठी चित्रपटाला संगीतबद्ध करणाऱ्या अक्षय वाळके व स्वप्निल वाळके या भावंडांचा तर ‘खेलो इंडिया खेलो’ मध्ये सक्रीय सहभाग घेणाºया वैभव मेश्राम यांचा सन्मान करण्यात आला.कबड्डी खेळाला अच्छे दिनकबड्डी हा खेळ देशात पुर्वीपासून खेळला जात असून एकाग्रता हा या खेळातील प्रभावी वैशिष्ट आहे. प्रो-कबड्डीमुळे क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना चांगला वाव असून कबड्डी खेळाला अच्छे दिन आले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच खेळांचीही आवड जपणे आवश्यक असल्याचे प्रो-कबड्डी खेळाडू निलेश शिंदे यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या एकीकरणातूनच बलाढ्य राष्ट्रनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:47 PM
छात्रशक्ती ही महाशक्ती असून बलाढ्य राष्ट्रनिर्मीतीची संकल्पना विद्यार्थ्यांच्या एकीकरणातूनच घडेल, यात दुमत नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रत्येक सदस्य देशसेवेच्या संस्काराचे बीज आत्मसात करून कार्य करित असतो. याचा सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन प्रो-कबड्डी खेळातील बंगाल वारियर्स संघाचा कर्णधार निलेश शिंदे यांनी केले.
ठळक मुद्देनिलेश शिंदे : अभाविपचे छात्र नेता संमेलन