जातपंचायतीच्या जाचामुळे सात बहिणींना आपल्या वडिलाच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना सोमवारी शहरातील भंगाराम वार्डात उघडकीस आली होती. १५ वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार त्यांच्या मृत्यूनंतरही पुन्हा एकदा आड आला. गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न व कार्यक्रमांना जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकून आर्थिक दंड ठोकला. या प्रकाराबाबत माहित आज आमदार जोरगेवार यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक साहाय्य केले. अशी विदारक स्थिती अन्य कुठल्याही कुटुंबावर येऊ नये, यासाठी विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगितले.
संविधानाच्या १० हजार प्रति वितरण करणार
सामाजिक दायित्व स्वीकारून अन्यायकारक रूढी परंपरांविरूद्ध जनसामान्यात सकारात्मक बदल घडविण्याकारिता राज्यात जनजागृती सुरू आहे. नागरिकांना भारतीय संविधान आणि आपले हक्क याबाबत माहिती मिळावा, यासाठी भारतीय संविधानच्या १० हजार प्रति वाटप करणार असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.