लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शासनाने प्लॉस्टिक व थर्माकोलवर निर्मिती व विक्रीवरही बंदी आणली. यासोबतच कठोर दंड ठोठावण्यात तरतूद केली. या कायद्याची पायमल्ली होऊ नये, यासाठी नगर परिषदच्या वतीने कठोर अंमलबजावणी केली जात आहे.प्लॉस्टिकचा वापर करताना सापडल्यास शिक्षा होते. पहिला गुन्हा करणाऱ्याला ५ हजार, दुसरा गुन्हा गेल्यास १० हजार व तिसरा गुन्हा केल्यास २५ हजाराचा दंड तसेच तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. व्यावसायिकांकडून याबाबतचे शपथपत्र लिहून घेतले जाणार आहे. शासनाच्या या कायद्याला अनुसरून भद्रावती नगरपालिकेने प्लॉस्टिक व थर्माकोल बंदीची मोहीम हाती घेण्यात आली. येत्या १६ एप्रिलपासून प्लॉस्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्लॉस्टिक बंदीबाबत प्रबोधन करण्यासाठी न.प. च्या सभागृहात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेला शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांना बोलाविण्यात आले होते. होते. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सभापती सुधीर सातपुते व मुख्याधिकारी विनोद जाधव तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. प्लॉस्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली. व्यावसायिकांनी यावेळी समस्या मांडल्या. प्लॉस्टिक बंदीवर अन्य पर्याय काय, याबाबतही विचारणा त्यांनी केली असता कापडाच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात वापरावे, अशी माहिती नगर परिषदच्या वतीने देण्यात आली. नगरसेवकांपासून तर अन्य ३५ प्रकारच्या अधिकाऱ्यांमार्फत प्लॉस्टिकबाबत कारवाई करण्याचे अधिकार शासनाने दिले आहे. भद्रावती न.प. द्वारे या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सहा पथके तयार करण्यात आहेत. एका पथकात चार कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार असून त्यांच्यासोबत पोलिसांची उपस्थिती राहील. या मोहिमेला शहरातील सर्व व्यापारी व दुकानदारांनी सहकार्य केल्यास प्लॉस्टिक मुक्तीचा संकल्प कृतीत उतरणार आहे.कागदी कपातून घेतला चहाकार्यशाळेत उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांना यावेळी पहिल्यांदाच न.प. द्वारे कागदी कपातून चहा देण्यात आला. प्लास्टिकच्या कपाऐवजी कागदी कप वापरण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला होता. यापुढे बॅनरलाही नवीन पर्याय दिला जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
प्लास्टिक बंदीची शहरात कठोर अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 1:14 AM
शासनाने प्लॉस्टिक व थर्माकोलवर निर्मिती व विक्रीवरही बंदी आणली. यासोबतच कठोर दंड ठोठावण्यात तरतूद केली. या कायद्याची पायमल्ली होऊ नये, यासाठी नगर परिषदच्या वतीने कठोर अंमलबजावणी केली जात आहे.
ठळक मुद्देनगर परिषदेची कारवाई : प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत व्यावसायिकांकडून घेतले शपथपत्र