शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
3
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
4
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
5
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
6
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
7
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
8
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
9
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
10
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
11
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
12
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
13
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
14
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
15
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
16
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
17
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
18
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
19
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
20
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार

अत्याचाराच्या 'त्या' घटनेचा कोरपनात सर्वपक्षीय निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 12:25 PM

मोर्चा काढून संताप : सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस पक्षाला मात्र बगल

लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना: कोरपना येथील एका शाळेतील मुलीवर शिक्षकाकडूनच लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. गुरुवारी (दि. ३) या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला.

या निषेध मोर्चात आरोपी शिक्षकाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यात शहरातील विविध पक्षांचे राजकीय नेते, विविध शाळेतील विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हा मोर्चा शहरातील जिल्हा परिषद शाळेपासून राजीव गांधी चौक, बसस्थानक मार्गे वणी रोडवरील हनुमान मंदिर परिसरापर्यंत काढण्यात आला. यानंतर निषेध सभा पार पडली. 

यावेळी मोर्चेकरांनी घोषणाबाजी केली. आरोपीला कायद्यानुसार कडक कारवाई करण्याच्या मागणीचे फलक नागरिकांनी हातात घेतले लेते महिला या मोर्चामध्ये सहभागी होऊन आरोपीविरुद्ध संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांची संख्याही लक्षवेधी होती. 

यावेळी माजी आमदार अॅड संजय धोटे, सुदर्शन निमकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सचिव सय्यद आबिद अली, शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील नवले, किशोर बावणे, भूषण फुसे, 'मनसे'चे प्रकाश बोरकर, रमाकांत मालेकर, श्रीनिवास मुसळे, अमोल आसेकर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

काँग्रेसचा वेगळा निषेध मोर्चा शिक्षकाकडून शाळकरी मुलीवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी काँग्रेसतर्फे वेगळा निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून दोषर्षीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने निघून बसस्थानक परिसरात विसर्जित झाला. येथे निषेध सभा पार पडली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विजय बावणे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम पेचे, नगराध्यक्ष नंदा बावणे, इस्माईल शेख, नगरसेवक नितीन बावणे, सुरेश मालेकर, संभाजी कोवे, गणेश गोडे, वहाबभाई यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सचिन भोयर, उद्धवसेनेचे डॉ. प्रकाश खनके आदी उपस्थित होते.

मुनगंटीवारांचे पोलिस प्रशासनाला निर्देश काँग्रेसच्या एका युवा पदाधिकाऱ्याने १२ वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. हे प्रकरण गंभीर आहे. आरोपीच्या कुटुंबातील अनेक लोक राजकारणी आहेत. संबंधित शाळेत यापूर्वीही असा प्रकार घडल्याचा आरोप महिलांनी केला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळेची मान्यता रद्द करण्याचा मुद्दा मांडण्यात येईल. या प्रकरणातील सर्व आरोप शोधून काढण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना दिले.

पोलिस अधीक्षक दाखल अत्याचार प्रकरणात दोन मोर्चे निघाल्याने पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आज तत्काळ कोरपना येथे भेट दिली व माहिती जाणून घेतली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांना केले वेगळे

  • या सर्वपक्षीय मोर्चाला येथील काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दिला व काँग्रेस पदाधिकारी मोर्चासाठी जिल्हा परिषद शाळेजवळ जमा झाले. 
  • मात्र इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मोर्चात सहभागी करून घेतले नाही. 
  • त्यामुळे या सर्वपक्षीय आंदोलनात राजकीय द्वेषही दिसून आला. अनेकांनी वेगवेगळी मते नोंदविली.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर