आॅनलाईन लोकमतजिवती : पहाडावरील पाणी टंचाई हे तेथील कोलाम बांधवांच्या पाचवीलाच पूजलेले दिसते. मात्र वास्तविकता वेगळी आहे. यातील अनेक गावात पाणी आहे. मात्र ते दूषित असल्याने कोलाम बांधवांना पाणी असतानाही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.काकबन या वस्तीत शासनाची विहीर आहे. पाणीही आहे. परंतु त्यात पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर वापरले जात नाही. त्यामुळे नाल्यातील वाहत्या झºयावरचे पाणीच नागरिक वापरताना दिसतात. लेंडीगुड्यातसुद्धा दोन शासकीय विहिरी आहेत. मात्र त्या निकामी आहेत. एक विहीर पूर्णता खचली तर दुसºया विहिरीचे बांधकामही अर्धवट आहे. दोन्ही विहिरीत सध्या पाणी असले तरी या विहिरी धोकादायक आहेत. नळाचे पाणी गावात सोडले जाते. परंतु तेही नियमितपणे नाही. त्यामुळे खोल दरीत नाल्यात डबका खोदून दूषित पाण्यावर कोलाम बांधवांना आपली तहान भागवितात.अंगणवाडी इमारत नाहीखडकी, रायपूर आणि कलीगुडा या तीनही आदिवासी गुड्यात अंगणवाडी इमारत नसल्याने वºहाड्यांतच बसवून त्यांना पोषक आहार दिला जातो. खडकी आणि कलीगुडा या दोन गुड्यात एकच अंगणवाडी आहे. अंगणवाडी इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना घडविताना व साहित्य ठेवण्यासाठी मोठा त्रास होत असल्याचे रायपूर येथील अंगणवाडी सेविका मिना पडवेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पाणी असूनही पाण्यासाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:22 PM
पहाडावरील पाणी टंचाई हे तेथील कोलाम बांधवांच्या पाचवीलाच पूजलेले दिसते. मात्र वास्तविकता वेगळी आहे.
ठळक मुद्देपहाडावरील वास्तव : उपाययोजना आवश्यक