शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

जगण्यासाठी धडपडताना ‘ती’ काळरात्र ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 5:00 AM

एखाद्या चित्रपटात घडावे याप्रमाणे घरात सर्वकाही सुरळीत असताना, रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. येथूनच नियतीने खेळ सुरू केला. पावसातच  परिसरातील रोहित्रात बिघाड झाला. थोड्या वेळाने वीज येईल, म्हणून डोळ्यात तेल टाकून लष्करे कुटुंबीय रात्री १२ वाजेपर्यंत वाट बघत होते. पण वीज आलीच नाही. कुटुंबप्रमुख या नात्याने रमेश लष्करे हे अस्वस्थ होते.

ठळक मुद्देनववधू आल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण असताना नियतीने साधला क्रूर डाव

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : म्हणतात ना, आयुष्य क्षणभंगूर आहे. कोणीही आयुष्याची हमी देऊ शकत नाही. दुर्गापुरात घडलेली घटना अशीच काहीशी आहे. सोमवारची रात्र जगण्यासाठी धडपडणाऱ्या लष्करे कुटुंबासाठी काळरात्र ठरेल, असा विचार कुणीही केला नव्हता. अखेर नियतीने डाव साधलाच. रमेश लष्करे हे पेटी कंत्राटदार. लहानसहान कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. यामुळे घरची परिस्थिती समाधानकारक होती. घरात आनंदाचे वातावरण. २८ जूनला मोठा मुलगा अजयचा विवाह झाला. नववधू आल्यानंतर घरातला आनंद दि्वगुणीत झाला. पण, या आनंदाला कुणाची नजर लागावी, असेच घडले. अजयची पत्नी माधुरी ही लग्नानंतर माहेरी गेली होती. ती घरात यावी आणि असे घडावे, यात तिचा काय दोष? मोठ्या आनंदात नववधू सोमवारी सासरी आली. हा दिवस तिच्यासाठी पहिला आणि शेवटचा दिवस ठरावा, ही कल्पनाही कोणी करू शकत नाही. मात्र नियतीनेच हा डाव रचला होता. एखाद्या चित्रपटात घडावे याप्रमाणे घरात सर्वकाही सुरळीत असताना, रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. येथूनच नियतीने खेळ सुरू केला. पावसातच  परिसरातील रोहित्रात बिघाड झाला. थोड्या वेळाने वीज येईल, म्हणून डोळ्यात तेल टाकून लष्करे कुटुंबीय रात्री १२ वाजेपर्यंत वाट बघत होते. पण वीज आलीच नाही. कुटुंबप्रमुख या नात्याने रमेश लष्करे हे अस्वस्थ होते. कुटुंबातील सदस्यांना निवांत झोपलेले पाहून कोणत्याही कुटुंबप्रमुखाला यापेक्षा दुसरा आनंद नसतो आणि घरात नववधू आलेली असताना, तिला अंधारात ठेवणे हे त्यांना खटकणारे होते. रात्री १२ वाजता त्यांनी अडगळीत पडलेले जनरेटर बाहेर काढले. ते सुरू करण्यासाठी त्यांनी रात्री धडपड करून पेट्रोल आणले. अखेर जनरेटर सुरू झाले. घरातील वीजदिवे प्रकाशमान झाले. पण हा प्रकाशच कुटुंबात कायम अंधार आणणारा ठरला. सर्व कुटुंबीय झोपी गेले. डोळ्यात झोप असल्यामुळे लगेच झोप लागली. अखेर काळाने डाव साधला. सकाळी लवकर उठणारी ही मंडळी, आज कोणीच कसे नाही उठले? म्हणून शेजाऱ्यांनी घरात डोकावून बघितले. पण आतील जे दृष्य दिसले, ते धक्कादायक होते. कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असल्यागत मृत्युमुखी पडलेले होते. रमेश लष्करे यांची पत्नी दासू यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्यांना लगेच रुग्णालयात हलविण्यात आले. त्या बेशुद्धावस्थेत होत्या. या घटनेत कुटुंब प्रमुखासह तीन मुले, एक मुलगी आणि मुलाची नववधू यांच्यावर काळाने झडप घातली. या घटनेने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

तातडीने रोहित्राची दुरुस्तीदुर्गापूर : वॉर्ड नंबर ३ हा झोपडपट्टीचा भाग आहे. येथे मोलमजुरी करणारे गोरगरीब लोक राहतात. सोमवारी रात्री आठ वाजता रोहित्रामध्ये बिघाड होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. रात्रभर वीज पुरवठा सुरूच झाला नाही. यामुळे वीज वितरण विभागाबद्दल नागिरकांमध्ये रोष होता. अशातच सकाळी वीज पुरवठा खंडित असल्याने घरात जनरेटर सुरू करून ठेवल्यामुळे लष्करे कुटुंबातील सहा जणांना दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर वीज वितरण विभागाने तातडीने रोहित्राची दुरुस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत केला.

खुशहालीऐवजी निधनाचा संदेशमाधुरी ही अजयच्या आत्याचीच मुलगी होती. २८ जूनला कोराडी महादुला येथे या दोघांचा विवाह धुमधडाक्यात पार पडला. २९ जूनला तिची बिदाई करण्यात आली. रिसेप्शन वैगेरे आटोपल्यानंतर ती माहेरी आली. काही दिवस माहेरी राहिल्यानंतर सोमवारी ती सासरी आली. यावेळी घरातील सर्व नातेवाईकांना सासरी गेल्यानंतर फोनवर खुशहाली कळवणार, असे सांगून ती सासरी आली. मात्र सकाळी तिच्या खुशहालीऐवजी मृत्यू झाल्याचा फोन खणखणल्याचे तिच्या नातेवाइकांनी सांगितले.

आक्रोशाने उपस्थितांचे पाणावले डोळेदुर्गापूर येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेतील सहाही मृतदेह शव जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. दरम्यान त्यांचे आप्तेष्ठसुद्धा तेथे पोहचले. यावेळी त्यांनी एकच हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश बघून जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या सर्वांचे डोळे आपसुकच पाणावले. दुर्गापूरच्या या घटनेने सर्वच हळहळत होते.

लोकप्रतिनिधी व प्रशासन निष्ठूरदुर्गापूर येथील घटनेने संपूर्ण देश हळहळला. मात्र स्थानिक जनप्रतिनिधीपासून ते आमदार, खासदार यांनी दुपारी १ वाजेपर्यंत लष्करे कुटुंबियांची घरी किंवा रुग्णालयात भेट देऊन साधी विचारपूस केली नाही. तसेच घटनेतील गंभीर असलेल्या व्यक्तीची साधी चौकशीही केली नाही. येथील लोकप्रतिनिधी व प्रशासन निष्ठूर असल्याचा आरोप मृतक नवविवाहित वधूचा मामा अनमनता लष्करे, लक्ष्मण इटकर यांनी केला आहे.

शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनातमंगळवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस येताच सर्वांना चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सहा जणांनाही मृत घोषित केले. तर दासू लष्करे (४०) गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे सर्व नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात जमा झाले होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलिसांना प्राचारण करण्यात आले.

 

टॅग्स :marriageलग्नDeathमृत्यू