कूचना : भद्रावती तालुक्यातील थोराना येथे कृषीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता व औद्यागिक कार्यानुभव कार्यक्रमाच्या अभ्यासादरम्यान शेतीविषयक विविध प्रात्यक्षिके करून शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती शेतातच दिली. त्यांच्या समस्या आणि शंकाचे निराकरण झाल्याने शेतकरी वर्गामध्ये जागरूकता आणि उत्साह निर्माण झाला आहे.
माती परीक्षण, एकात्मिक कीड, रोग व तण व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, निंबोळी अर्क विषयक प्रात्यक्षिक, जनावरांवरील रोग नियंत्रण, गावातील अनेक समस्या इत्यादी विषयांवर चर्चासत्र व प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी थोरणा या गावात आयोजित केली होती. श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीचे विद्यार्थी अक्षय काळे, ललित चाफले, कृषी महाविद्यालय अकोलाचा विद्यार्थी तेजस वांदिले, कृषी महाविद्यालय तोंडापूरचा विद्यार्थी रजत भट, कृषी महाविद्यालय पुणेचा विद्यार्थी प्रणाल नन्नावरे यांनी मार्गदर्शन केले.
050921\img-20210902-wa0039.jpg
सेंद्रिय शेतीचे महत्व सांगताना विद्यार्थी