राजुरा : विद्येसारखे पवित्र ज्ञान या जगात नाही. ते सार्थ करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पाठ्यपुस्तक. पाठ्यपुस्तकाचे वितरण गरीब होतकरू मुलांना करण्यात येत असून स्पर्धेच्या माध्यमातूनच विद्यार्थी घडत असतो, असे प्रतिपादन लता चांडक यांनी केले.
हेल्पिंग हॅन्डच्या सेवा भावी संस्थेकडून संकटमोचन हनुमान मंदिर प्रांगणात पुस्तक वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून लता चांडक तर प्रमुख अतिथी म्हणून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे सचिव बादल बेले, संकट मोचन हनुमान मंदिराचे पंडित राधेय व भानुप्रसाद अमृता धोटे, कंचन चांडक, रमा आईटलावार, स्वरूपा झंवर, वर्षा झंवर, रचना नावंदर, भावना रागीट, स्नेहा सायंकार, रेखा बोंडे, आशा चांडक, स्नेहा चांडक, सीमा कलसे, वज्रमाला बतकमवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात शिवाजी हायस्कूल शाळा, आदर्श हाॅयस्कूल शाळा तथा जिजामाता शाळेतील एकूण २० गरजू विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यात इयत्ता ९ व १० वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. संचालन रजनी शर्मा यांनी केले. प्रास्ताविक कृतिका सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिता जमदाडे यांनी केले.
150721\img_20210712_171456.jpg
पुस्तक वाटप