‘ते’ विद्युत खांब बदलविण्याची मागणी
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खांब बदलविण्याची मागणी होत आहे.
गोल बाजारातील अतिक्रमण हटविण्याची मागणी
चंद्रपूर : येथील बाजार वार्डातील सर्वाधिक गजबजलेला परिसर गोलबाजार आहे. या ठिकाणी व्यावसायिकांची मोठी चाळच आहे. याशिवाय येथे दररोज भाजीबाजारही भरतो. पूर्वी गोलबाजारात गांधी चौकापर्यंत जाण्यासाठी मोठा रस्ता होता. मात्र सध्या व्यावसायिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून पायदळ चालतानाही त्रास सहन करावा लागत आहे. एखादा वाहनधारक बाजारातून दुचाकी चालवित असल्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकही संताप व्यक्त करीत आहे. त्यामुळे या ठिकाणचे अतिक्रमण हटवून बाजारात दुचाकी वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
मानधन वाढवून देण्याची मागणी
चंद्रपूर : शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत समाजातील गरीब, वयोवृद्ध, विधवा, असहाय व अपंग महिला व पुरुषांना श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला हजार रुपयांचे मानधन दिल्या जाते. मात्र सदर मानधन अत्यल्प असल्याने ते वाढवून द्यावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. गरीब, निराधार व गरजू लोकांना उदरनिर्वाह करण्याकरिता या वेतनाची मदत मिळते.
कृषी पंपाच्या बिलात दुरूस्ती करावी
भद्रावती : वीज वितरण कंपनीच्या वरोरा उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाºया वरोरा व भद्रावती तालुक्यातील अनेक शेतकºयांना चुकीचे वीज बिल देण्यात आले. शिवाय, काही शेतकºयांच्या कृषिपंप वीज जोडणीची प्रक्रियाही प्रलंबित आहे. मनमानी देयक पाठविल्याने शेतकºयांनी भरणा केला नाही. त्यामुळे आधी बिलात दुरूस्ती करावी. त्यानंतरच भरणा करू, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफ ारशी लागू करावी
चंद्रपूर : शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून नव्याने काढलेले अध्यादेश रद्द करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. मागील काही वर्षांपासून शेती पूर्णत: तोट्यात आहे. लागवडीचा खर्च देखील निघत नाही. डॉ. स्वामीनाथन आयोगाने शेतकºयांच्या हितासाठी शिफ ारशी कागदावर राहिल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
आॅटो चालकांच्या समस्या सोडवा
चंद्रपूर : आॅटो चालकांना कामगार कायद्यानुसार कोणतीही सुरक्षा नाही. वाढत्या महागाईनुसार उत्पन्न मिळत नाही. आॅटो चालक व मालकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करावी, अशी मागणी आॅटो चालकांनी केली आहे.
डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी
कोरपना : येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने महिला रुग्णांची गैरसोय होत आहे. येथील रुग्णालयात यवतमाळ जिल्हा व परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने येत असल्याने नेहमीच गर्दी असते. स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने महिला रुग्णांना चंद्रपूर किंवा इतरत्र उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नाल्यातील गाळ काढण्याची मागणी
वरोरा : शहरात अनेक नाल्यांच्या बाजुला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरूंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात. त्यामुळे दुरुस्ती करून गाळ काढण्याची मागणी केली जात आहे.